================================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(का. प्र.): साप्ताहिक कलम मांगे इन्साफ रजत महोत्सव पदार्पण वर्धापन दिन विशेषांक – 2025 चे विमोचन माजी खासदार नरेश बाबूजी पुगलिया यांच्या हस्ते गांधी चौक येथील नरेशजी पुगलिया यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 3 वाजता अतिशय थाटात संपन्न झाले.
साप्ताहिक कलम मांगे इन्साफ रजत महोत्सव पदार्पण वर्धापन दिन विशेषांक – 2025 चे विमोचन कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
या विमोचन कार्यक्रमाची सुरुवात मौलाना तुफैल अहमद यांनी तिलावते कुरआनी चे वाचन करून केली.
साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक, सय्यद रमजान अली यानी माजी खासदार नरेश बाबू पुगलिया याना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत सत्कार केले, तर नंतर मुख्य अतिथी दीपक जैस्वाल माजी नगराध्यक्ष यांचेही स्वागत सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन सय्यद रमजान अली यांनी केले.
तत्पश्चात विमोचन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी दीपक जैस्वाल यांनी साप्ताहिक कलम मागे इन्साफ चे संपादक सय्यद रमजान अली यांना शुभेच्छा देत लेखणीच्या माध्यमातून निरंतर निष्पक्ष न्याय देण्याचे काम आपल्याकडून केले जात आहे. व पुढेही असेच कार्य आपल्याकडून होत राहावे अशी अपेक्षा देखील याप्रसंगी जैस्वाल यांनी व्यक्त केली.
रजत महोत्सव पदार्पण वर्धापन दिन विशेषांक 2025 विमोचन चा हा कार्यक्रम माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखाली झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांनी सांगितले की रमजान भाई हे मागील 24 वर्षापासून आपले साप्ताहिक प्रकाशित करीत आहे व आज साप्ताहिक कलम मागे 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे हे अतिशय वाखाण्याजोगे असून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न केले व आजही करीत आहे सर्वधर्मसमभाव जपून सर्वांशी मिळून मिसळून लेखणीच्या माध्यमातून त्यांच्यात सर्वांना आपलेसे करण्याची क्षमता असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे देखील याप्रसंगी त्यांनी सांगितले व साप्ताहिक कलम चे संपादक सय्यद रमजान अली यांना शुभेच्छा देखील दिल्या.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार यशवंत दाचेवार, सदानंद खत्री, मतीन कुरेशी, बापू अन्सारी, शेख अनवर, शेख मुखत्यार, बाबूलाल करुणाकर, असलम भाई, अब्दुल एजाज, अहमद भाई, निळकंठ रघाताटे, हाजी अब्दुल सलाम, सुधाकर सिंह गौर, विजय आडकुजी चहारे, इमरान दोसानी, राजेंद्र दुदानी, देवेंद्र बेले, गुलाब पाटील, प,रतन शिलावार,युसुफ कुरेशी, पत्रकार शशिकांत ठक्कर, चंदन देवांगन, प्रमोद दुबे, मिलिंद दिंडेवार,वैभव दादा, इंजिनीयर गुप्ता, पत्रकार सुलतान अशरफ अली, सय्यद जुनेद अली सह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चा रजत महोत्सव पदार्पण वर्धापन दिन विशेषांक – 2025 चा विमोचन सोहळा अतिशय थाटात संपन्न झाला व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सदानंद खत्री यांनी केले. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356