=============================
चौकाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर,(का प्र) : पडोली गावाच्या विकासासाठी पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ते, आणि वाचनालय उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, आ, सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पडोली चौकातील वाहतूक सिग्नलचे उद्घाटन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, नामदेव डाहुले, पडोलीचे सरपंच विक्की लाडसे, माजी सैनिक मनोज ठेंगणे, अनिल डोंगरे, रणजीत डवरे, सुरज पेद्दूलवार, प्रज्वलंत कडू, शोभाताई पिदुरकर, अनुताई ठेंगणे तसेच पडोली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “सत्तेत असो किंवा नसो, जनतेच्या हितासाठी मी नेहमीच लढा दिला आहे. जनतेकडून एखादी मागणी केली जाते. ती मागणी संसदीय आयुधांचा वापर करून आणि आवश्यकता असल्यास आंदोलन करीत ती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आजपर्यंत काम केले आहे.

पडोली चौकाच्या उद्घाटनाप्रसंगी आ, मुनगंटीवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत या चौकात ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आंदोलने झाली. अनेक प्रश्न चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून सोडवली गेली. विशेषतः माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी या चौकात वारंवार होणारे अपघात, वाढती वर्दळ आणि जड वाहतूकीच्या समस्येवर तोडगा म्हणून वाहतूक सिग्नल बसवण्यासाठी उपोषण केले. त्यांच्या मागणीची दखल घेत स्वतः उपोषण स्थळी भेट देत या मतदारसंघाचा आ, नसताना देखील या चौकाचे सौंदर्यीकरण व वाहतूक सिग्नलसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याचे आ,. मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितले.

पडोली गावाच्या विकासासाठी यापूर्वीच पाणीपुरवठा योजना, सिमेंट रस्ते, बोरवेल आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. रेल्वे विभागामार्फत हटविल्या जाणाऱ्या घरांचा प्रश्न सोडविला. पडोली येथे 1 कोटी 47 लाख रुपये खर्चून वाचनालय उभारले जात आहे. या गावाच्या समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः लक्ष देईल. चंद्रपूर शहरात प्रवेश करताना सर्वात पहिले दर्शन पडोलीचे होते आणि पडोली गाव जितके चांगले करता येईल त्यासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील, असा विश्वास देखील आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

राजकारणात दिलेला शब्द पाळला पाहिजे, यादृष्टीने आजवर काम केले. मी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. एखाद्या प्रश्न कायदेशीर अडचणीने राहिला तेवढाच राहिला असेल, असेही ते म्हणाले.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल:
महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवले जात आहेत. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक शक्ती असून त्या सक्षम झाल्याच पाहिजेत, असे. मुनगंटीवार सांगितले. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून चंद्रपूर-बल्लारपूरच्या मध्यभागी एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र उभारले जात असून येथे 62 कौशल्य आधारित कोर्सेस असणार आहेत. तसेच स्वर्गीय सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित होत असून, विशेष बाब अंतर्गत मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.याशिवाय, मोरवा येथे फ्लाइंग क्लबमुळे या भागातील मुलींना पायलट बनण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः पडोलीच्या मुलींनी पायलट व्हावे, अशी अपेक्षा आ, सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने अधिक पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
पडोली ग्रामपंचायतने या चौकाला छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्याचा निर्णय केला आहे. या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा बोर्ड उभारावा. यासाठी लागणारा आवश्यक निधी स्वतः उपलब्ध करून देणार असल्याचे आ, सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ==================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ====================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356