==============================
चिमूर
हॅलो चांदा न्यूज
चंद्रपूर, (वि प्र ):-15/03/2025 रोजी गुप्त बातमीदाराचे खात्रीशीर खबरीवरून आरोपी नामे वहीद अब्दुल रहीम याचे वर चिमुर बसस्थानक येथे गुंगिकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियमाखाली कारवाई केली असता त्याचे ताब्यातील कथ्या रंगाचे बॅगेत एकुण 1964 ग्रॅम. वजन असलेला गांजा हे गुंगिकारक औषधीद्रव्य पोलीस स्टाफ, पंच, फोटो ग्राफर, मापारी यांचे समक्ष मिळुन आला. सदर घटनास्थळी गांजा रितसर जप्त करून आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, आणि नयोमी साटम सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा अतिरीक्त कार्यभार चिमुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष बाकल, स.पो.नि. निशांत फुलेकर, स.पो.नि. मल्हारी ताळीकोटे, पो.उपनि. दत्ताहरी जाधव, सहाय्यक फौजदार विलास निमगडे, सचिन खामणकर, भरत घोळवे, सचिन साठे, कुणाल दांडेकर, सोनु एलकुचेवार यांचे पथकाने केली. सदर आरोपी अटकेत असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर पो.स्टे. चिमुर हे करीत आहेत. =========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356