शांतता समिती सर्व धर्मीय प्रतिष्ठित, मस्जिद कमिटी मुख्य पदाधिकारी बैठक संपन्न.

0
7

================================                   चंद्रपूर           हॅलो चांदा न्यूज चंद्रपूर(वि.प्र.)नागपूर येथे काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी झालेल्या जातीय घटना अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याचे दृष्टिकोनातून आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता बैठकीचे आयोजन पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे करण्यात आले होते या बैठकीत,सर्व धर्मीय प्रतिष्ठित,मस्जिद कमिटी मुख्य पदाधिकारी, मौलाना व शांतता समिती सदस्याची प्रामुख्याने उपस्थिती होती. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात ही बैठक संपन्न झाली.सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह विधान आल्यास किंवा चित्रफीत आल्यास त्याबाबतची माहिती सायबर पोलीस स्टेशनच्या 8888511911 या मोबाईल क्रमांक द्यावी असे देखील चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सखोल असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांना केले.या बैठकीला चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, प्रवीण खोब्रागडे, रामजीवन सिंग परमार, सुबस्टियन जॉन, शालिनी भगत, विजय राऊत, शहर शांतता समितीचे सदस्य मोरेश्वर खैरे, दर्शन बुरडकर, सागर खोब्रागडे, गुलजार खान,विकास सोनकुसरे, रोडमल गहलोत,शहीद शेख, जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष युनुस कुरेशी, मौलाना अब्दुल कदीर, मौलाना अनवर, मौलाना शरीफुल हक, मिर्जा सलीम बेग, शकील अहमद अब्दुल शदीद, मुश्ताक रिजवी, अफजल खान पठाण,मोहम्मद साबीर, कादर अहमद, मोहम्मद गाजी, VHP चे प्रकाश एकोणकर, बजरंग दल चे आकाश राजू कोकमलवार, विजय शर्मा, हर्षल बनकर, विक्रांत समुद्रालवार, तनवीर, अरबाब सय्यद, शेख अरबाज आलम, मिर्झा शकील बेग,हरिदास नागपुरे, अंजुम गौस,युसुफ कुरेशी, रऊफुल हसन शेख, मेहबूब अहमद अली, जुबेर आझाद, एकनाथ मगरे, लक्ष्मण कडूकर, अमित नथवाणी, सागर चिंतावार, भिवराज सोनी, सर्फराजउद्दीन, इमरान खान, संतोष पारखी, विशेष शाखेचे सुजित बंडीवार सह अनेक मान्यवर या बैठकीत उपस्थित होते.        ===============================  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      =============================                 *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,**कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069**बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻Gmail 📨⬆️⏬

     ही बैठक चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली या बैठकीत चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव उपस्थित होते.या बैठकीत उपस्थित मान्यवरांना पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की आपण जिल्हा पोलीस प्रशासनास आपले मौलिक सहकार्य करावे कोणतीही अफवा पसरल्यास किंवा सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट आल्यास त्याची माहिती त्वरीत पोलीस स्टेशनला देण्यात यावी. चंद्रपूर जिल्हा हा शांतता प्रिया जिल्हा असून येथील शांतता कायम राहील असे विश्वास मला आहे व आपण देखील या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहात आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्याची शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवू व जातीय सलोखा कायम ठेवू असे देखील या बैठकीत सांगितले.चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे संपन्न झालेल्या बैठकीत अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त करीत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना सांगितले की आम्ही सर्व मिळून चंद्रपूर जिल्ह्याची शांतता कायम रहावी यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील राहणार व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा संकल्प देखील याप्रसंगी केला.

  • shashithakkar2409@gmail.com
    9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here