================================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी काही दिवसांपूर्वी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी अमोल काचोरे यांची देखील नियुक्ती तेव्हाच करण्यात आली होती जेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी सांभाळला आहे तेव्हापासून मात्र गुन्हेगारावर करडी नजर ठेवून त्यांच्या मुस्क्या आवळण्यात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व त्यांच्या टीमला मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे असे बोलल्यास वावगे ठरणार नाही. कारण की आवाज धंदे करणाऱ्या वर तर त्यांनी अनेक कार्यवाही केल्यास आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता सुद्धा ते विशेष प्रयत्नशील असल्याने गुन्हे घडविणाऱ्यांची तंतोतंत माहिती आपल्या सूत्राच्या माध्यमातून प्राप्त करून वेळीच असे गुन्हेगारांना धडा शिकवण्यात सुद्धा त्यांना यश मिळत आहे, हे ही मात्र तेवढेच खरे!
चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेश व त्यांच्या मार्गदर्शनामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन मधील अधिकारी सक्रिय झाले आहेत असेही म्हणता येईल. त्यातच अमोल काचोरे हे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशाचे अनुपालन करीत त्यांच्या मार्गदर्शनात पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे असेही म्हणता येईल.
दिनांक २४/०३/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये चंद्रपुर चंद्रपुर शहरात बनावटी सोना विक्री करून फसवणूक करणारी टोळी फिरत असल्याची गोपनिय बातमी मिळाले वरून सराफा लाईन येथील सोनार व ईतर व्यापारी यांना सतर्क करणे कामी तसेच नमुद इसमांचा चंद्रपुर शहरात शोध घेत असतांना छोटा बाजार परिसरातील जया कलेक्शन या दुकानाचे मालक नामे राकेश मंधानी, रा. रामनगर चौक, चंद्रपुर यांना महिती देत असतांना त्यांनी सांगितले की, त्यांचेकडे काही वेळापुर्वी तिन इसम व एक महिला हे सोना विक्री करीता आले असुन त्यांनी सोन्याचे मणी दाखवुन त्यांचेकडे असलेली सोन्याची माळ आणणार आहे. त्यांचेकडे जवळपास एक किलोच्यावर सोने असल्याचे सांगुन २० लाख रूपये मध्ये विकायचे आहे असे सांगितले. त्यावरून पंचा समक्ष सापळा रचुन आरोपी नामे १) अतुल उर्फ मुखी बनाराम परमार, वय-३९ वर्ष, रा. नई आवादी, बोथला सराया, आगरा (उत्तरप्रदेश), २) शुत्रघ्न सिताराम सोलंकी, वय-४० वर्ष, रा. पश्चिमपुरी, दिपनगर, घर क्रमांक ए-७७, आगरा, उत्तरप्रदेश, ३) पुरन प्रेमचंद बघेल, वय-३८ वर्ष, रा. देवबलोदा, ता. पाटन, जि. दुर्ग, राज्या छत्तीसगड, ४) श्रीमती लक्ष्मी सेवाराम राठोड, वय-५५ वर्ष, रा. रेहीनाकी पुलीया, फैजीवाली गल्ली, फिरोजाबाद, ह. मु. नई आवादी, बोथला सराया, आगरा (उत्तरप्रदेश) यांचेकडुन १) ४ नग सोन्याचे मनी वजन १.५ मिली ग्रॅम किमंत १५,०००/- रू २) पिवळया धातुचे बनावटी मनीची माळ वजन १.३६१ किलो ग्रॅम (बनावटी नकली सोन्याची) किमंत १,०००/- रू, ३) दोन वेगवेगळया कंपनीचे मोबाईल किमंत २,०००/- असा एकुण असा एकुण १८,०००/- रूपयचा माल जप्त करून नमुद आरोपीतां विरूध्द पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
सदर कार्यवाही चंद्रपुर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, पो.उप.नि. सुनिल गोरकार, पो.हवा. किशोर वैरागडे, पो.हवा. दिपक डोंगरे, पो.हवा. सतिश अवथरे, पो.हवा. रजनिकांत पुठ्ठवार, म.पो.हवा. निराशा, पो.शि.अमोल सावे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे. ========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ======================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

























