1 लाखावर थकबाकी असणाऱ्यांच्या नावाचे लागले बॅनर.

0
38

===============================

                       चंद्रपूर

             हॅलो चांदा न्यूज 

चंद्रपूर(का.प्र.): एक लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांना करभरणा करण्यास मनपाद्वारे 21 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र तोपर्यंत करभरणा न करणाऱ्या सर्व थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केली गेली असुन शहरातील वर्दळीच्या सर्व चौकांवर असे बॅनर लावण्यात आले आहे.

यात विनोद बुराडे -116278,लागूबाई भुफा-153184 ,नामदेवराव पारवेकर- 150086,केवलराम गुलाणी -4560 82, विनस बनोत-122977, विदर्भ काँक्रीट प्रा. -198557,विठ्ठल पंदीलवार- 320515,मो. नजीर अ. करीम-177441,
महंमद वसिउद्दिन-362228 ,निर्मलादेवी पंडीत- 620491, शामराव लांडगे- 1180007 समृद्ध जीवन फूड्स लि.- 469093, सायराबाई गांधी-166911, रीना सरकार- 203392,समृद्धी सेविंग इन्व्हेस्टमेंट-180620 असे एकुण 51 लक्ष 29 हजार थकबाकी असणाऱ्या 16 थकबाकीदारांची नावे प्रकाशित करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक जण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठीच मनपाद्वारे थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास येत आहे. कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने अनेक जणांनी कराचा भरणा केला आहे.

1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता. यासाठी त्यांना यासाठी 21 मार्चची मुदतसुद्धा देण्यात आली होती.मात्र याउपर करभरणा न केल्यास थकबाकीदारांची नावांचे बॅनर प्रसिद्ध करण्यात आले आहे. नावे प्रसिद्ध झाल्यानंतर जर कुणाची मानहानी झाली तर त्याला ते स्वतः जबाबदार राहणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे या आधीच स्पष्ट करण्यात आले होते.

या होणाऱ्या कारवाईमुळे ज्यांना या मोहिमेच्या परिणामांची कल्पना आली होती त्या थकीतदारांनी ऑनलाईन तसेच अथवा ऑफलाईन माध्यमातुन आपल्या कराचा भरणा केला आहे. अशी माहिती एका पत्रकान्वये मिळाली आहे.    =========================    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ===================

*हॅलो चांदा न्यूज,                         मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here