==================================
गडचिरोली
हॅलो चांदा न्यूज
गडचिरोली(का प्र) :– राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गडचिरोली विभागातील कर्मचारी व प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली. विभाग नियंत्रक कार्यालय, एस.टी. बस स्थानक, धानोरा रोड येथे पार पडलेल्या या बैठकीत विभागीय अध्यक्ष तसेच भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते अध्यक्षस्थानी होते.बैठकीच्या प्रारंभी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेच्या वतीने माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक सेवेसाठी त्यांना नुकतीच डॉक्टरेट पदवीने सन्मानीत केल्याबद्दल गडचिरोली आगाराचे विभाग नियंत्रक मा. वाडीभस्समे साहेब आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यानंतर सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या सन २०२५ च्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली, तसेच गडचिरोली एस.टी. महामंडळातील कर्मचारी आणि प्रवाशांच्या समस्या याविषयी विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आले.
बैठकीत विभागीय कार्याध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजपा सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,गडचिरोली आगाराचे विभाग नियंत्रक वाडीभस्समे सर तसेच एस.टी. आगार अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकिचे विभागीय अध्यक्ष मा.खा.डॉ. नेते यांनी गडचिरोली आगारातील बससेवेच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेत विद्यार्थ्यांसाठी प्रवास अधिक सुलभ करण्याच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. नवीन बसेसची उपलब्धता, वेळेवर सेवा देण्याची गरज आणि प्रवाशांना येणाऱ्या अडचणी यावर सखोल चर्चा झाली.
गडचिरोली हा आदिवासी व ग्रामीण भाग असल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळणे, बसेसची संख्या वाढवणे आणि प्रवास अधिक सोयीस्कर करण्यावर भर दिला गेला. विभागीय अधिकाऱ्यांनी या मुद्द्यांवर सकारात्मक विचार करत शक्य तितक्या लवकर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाचे कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यात प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीमुळे गडचिरोली विभागातील एस.टी. कर्मचारी व प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356