================================
झाडीपट्टी रंगभूमीसाठी ५ कोटी, तर महाकाली यात्रेसाठी दरवर्षी २ कोटीं रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी.
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर, (का प्र):- महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या चंद्रपूर दौर्यानिमित्त भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे श्री माता महाकालीची मूर्ती, अम्मा का टिफिन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक आणि विकासविषयक मागण्यांवर चर्चा करण्यात आली. झाडीपट्टी रंगभूमीसाठी ५ कोटी निधी तसेच महाकाली यात्रेसाठी दरवर्षी २ कोटी रुपयांच्या निधीची तरदूत करण्याची मागणी करण्यात आली.याप्रसंगी अजय जैस्वाल, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथ सिंग ठाकूर, माजी महानगर जिल्हाध्यक्ष तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रदीप किरमे, श्याम कनकम, पुरुषोत्तम राऊत, विठ्ठल डुकरे, पूनम तिवारी, शेखर शेट्टी, अमोल शेंडे, विश्वजित शहा, जितेश कुळमेथे, प्रतीक शिवणकर, करण बैस, सुमित बेले, हरमन जोसेफ, विनोद शेरकी, शशिकांत म्हस्के, विकास खटी, संजय निकोडे, अभिजित पोटे, राजू व्यंकटवार, कार्तिक बोरेवार, महेश गहुकर, संजय महाकालीवार, सुरेंद्र अंचल, रुपेश पांडे, ताहीर हुसेन, राकेश पिंपळकर, करण नायर, गुड्डू सिंग, मंगेश अहिरकर, अक्षय घोटेकर, नीलिमा वनकर, विमल काटकर, शालू कनोजवार आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने झाडीपट्टी रंगभूमीच्या संवर्धनासाठी चंद्रपूर येथे रंगमंचाच्या बांधकामासाठी ५ कोटी निधी मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भातील लोककलेचा अनमोल ठेवा असून, या पारंपरिक नाट्यप्रकाराच्या जतन व प्रसारासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
तसेच, चंद्रपूरमधील श्री महाकाली माता यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षेसाठी दरवर्षी २ कोटी निधीची तरतूद करण्याची विनंती करण्यात आली. यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्वच्छता, वाहतूक नियोजन तसेच सुरक्षाव्यवस्थेवर विशेष भर देण्याची गरज असल्यामुळे दरवर्षी हा निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ======================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ====================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356