=================================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(का.प्र.): दिनांक १७/०५/२०२५ रोजी पोउपनि संदिप बच्छिरे पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे असतांना त्यांच्या इन्फॉरमर द्वारे माहीती मिळाली की, एक इसम राजनगर, सहारा पार्क आरवट रोड, चंद्रपूर येथे देशी कट्टा व काडतुस घेवून येणार आहे. सदर माहीती मिळताच पो.उप.नि. बच्छिरे यांनी पो.नि. प्रभावती एकुरके यांना माहीती दिली असता पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी तात्काळ पो.उप.नि. बच्छिरे व डी. बी. पथक सह आरवट येथे सापळा रचुन एक इसमास पकडुन त्याच्याकडे असलेला एक देशी कट्टा व २ जिवंत काडतुस जप्त केले. व सदर इसमावर पोस्टे चंद्रपूर शहर येथे गुन्हा क. ३५१/२५ कलम ३,२५ भारतीय शस्त्र अनिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली.आहे. आरोपीचे नाव रोहीत उर्फ मोनू राजकपूर कातकर वय २४ वर्षे, रा. विचोडा रयतवारी, पोस्ट पडोली ता. जि. चंद्रपूर असे.आहे.
सदरची कार्यवाही चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक. रिना जनबंधु मॅडम, उपविभागीय पोलीस अधीकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक प्रभावती ऐकुरके मॅडम पोलीस ठाणे चंद्रपुर शहर यांनी व त्यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि. संदिप बच्छिरे, पो.हवा. सचिन बोरकर, पो.हवा. भावना रामटेके, संजय धोटे, संतोष कनकम, ना.पो.अ. कपूरचंद खरवार, पो.अं. विक्रम मेश्राम पोअ रूपेश पराते, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, सारीका गौरकर व दिपीका झिंगरे यांनी केली असुन पुढील तपास सपोनि राजें सोनवने हे करत आहे. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356