================================
आमदार देवराव भोंगळे यांचे हस्ते पक्षप्रवेश.
कोरपना(ता.प्र.): कोरपना. तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायतीचे सरपंच तथा शेतकरी संघटनेचे नेते दिलीप पाचभाई यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते काल दि. २२ मे रोजी भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. यावेळी, आमदार देवराव भोंगळे यांनी सरपंच दिलीप पाचभाई यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या येण्याने पक्षाला वनोजात आणखी बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, जिल्हा सचिव विशाल गज्जलवार, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, कोरपना शहराध्यक्ष अमोल आसेकर, गडचांदूर शहराध्यक्ष अरूण डोहे, बापुराव मडावी, पुरुषोत्तम भोंगळे, आशिष ताजने, दिनेश खडसे, दिनेश ढेंगळे, कार्तिक गोण्लावार, नैनेश आत्राम, दिवाकर ढोके, पवन बुरेवार, रामदास चुदरी, अरविंद कोरे, जगदीश पिंपळकर, धम्मकीर्त्ती कापसे, अजय मुंगीरवार, नारायण कोल्हे, तिरुपती किन्नाके, सुधाकर ताजने यांचेसह ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती.होती.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356