==============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपुरात दारूबंदी हटल्यापासून नकली दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून गडचिरोली जिल्ह्यातही नकली देशी विदेशी दारू विक्रीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
विशेष म्हणजे रॉकेट नावाची देशी दारू प्रवरा डिस्टिलरी प्रवरानगर असे लेबल लावून त्या बॉटलमध्ये नकली दारू भरून विक्री केली जात असल्याचे स्पष्टपणे उघड झाले आहे. नकली दारूची विक्री व पुरवठा करण्यात फार मोठे रॅकेट सक्रिय असावे असे देखील बोलले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड,
एटा पल्ली, ताडगाव परिसराच्या जंगलात गडचिरोलीच्या स्थानीय गुन्हे शोध पथकाने पंधरा ड्रम अल्कोहोल सह खाली बाटल व पॅकेजिंग सामग्री या जंगलातील कारखान्यावर झाड टाकून जप्त करीत या कारवाईत धुलिया येथील रहिवासी पावरा आडनाव असलेले इसमास अटक करण्यात आली असून या गुन्ह्यातील बल्लारशा येथील पवन जयस्वाल, अंकुश ज्ञानसिंग वर्मा, धर्मा रॉय यांचा सहभाग असल्याचे समजताच स्थानीय गुन्हे शोध पथकाने धर्मा रॉय यास ताडगाव जंगलात पकडले व कोर्टाने त्यांना मध्ये पाठविले. यातील इतर दोन आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांच्या शोधात आहे. नकली दारू तयार करण्यासाठी असलेली संपूर्ण सामग्री दोन आरोपीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या गडचिरोलीच्या पथकाने पकडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत अशी कारवाई का केली नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
काही महिन्यापूर्वी गोल पिंपरी चे कर्तव्याचे ठाणेदार यांनी आईस थर्माकोल च्या मोठ्या बॉक्समध्ये आयशर गाडीत रस्त्यावर नाकेबंदी करून नकली देशी दारू आरोपी व मुद्देमालसह पकडली होती व आरोपी यास जेलमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली.
अशाच प्रकारे काही दिवसापूर्वी मिलिंद वाईन शॉप बल्लारशा येथे नकली रॉकेट नावाची देशी दारू (प्रवरा डिस्ट्रिलरी प्रवरानगर) चे लेबल लावून बल्लारपूर येथील टेकडी वार्डातून वाहतूक करीत असताना पकडण्यात आली होती व जप्त केलेल्या या दारूची प्रयोगशाळेत तपासणी केली असता पकडण्यात आलेली ही दारू नकली असल्याचे प्रमाणित झाल्याने या मिलिंद वाईन शॉपला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सिल ठोकण्यात आले.
असे सर्व प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नजरे समक्ष का येत नाही ? राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अशा गैरप्रकाराला थांबविण्यासाठी सक्षम नाही का! हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीत आहे!
जिल्ह्यात नकली देशी व विदेशी दारूचे प्रमाण वाढत चालले असल्याचे बुद्धिजीवी वर्गाकडून बोलले जात आहे मात्र याचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी घेत नाही अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे व त्याचप्रमाणे सर्वाधिक खप असलेली रॉयल स्टॅग नावाची नकली व्हिस्की सुद्धा सर्रासरीत्या विकली जात असल्याची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे याबाबतीतही राज्य उत्पादन शुल्क व संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असे देखील बोलले जात आहे. नकली देशी विदेशी दारू सहजपणे काही अधिकृत वाईन शॉप च्या माध्यमातून विक्री/पुरवठा केली जात असल्याची ओरड आहे.याबाबतीत संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी असे देखील बोलले जात आहे.
रॉयल स्टॅग नावाची व्हिस्की ची एक पेटीची मूळ किंमत नजर असल्याची माहिती मिळाली असून याच रॉयल स्टॅग ची नकली विदेशी दारूची पेटी 6000 रुपयात चंद्रपूर जिल्ह्यात विक्री केली जात असल्याचे माहिती सूत्रानुसार मिळाली आहे. अधिकचा नफा मिळविण्यासाठी रॉयल स्टॅग व्हिस्की च्या नावाचा गैरवापर करून अधिकचा नफा मिळविण्यासाठी लालसेपोटी कोणते रॅकेट व कोणते वाईन शॉप चालक – मालक हा गोरख धंदा चालवीत आहे व लोकांच्या जीवनाशी – आरोग्यांशी खेळत आहे, याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई झालीच पाहिजे असा आग्रह देखील नागरिकाकडून केला जात आहे.
चंद्रपूरकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा नकली दारू तस्करांवर संबंधित विभागाच्या वरिष्ठाकडून कारवाई झालीच पाहिजे असा सूर आता ऐकू यायला लागला आहे.
यात विशेष म्हणजे चर्चा सूत्रानुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे काही देशी व विदेशी दारूचे दुकान, वाईन शॉप, परमिट रूम सील होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
नकली देशी दारूची पेटी 2800 रुपये ला विक्री केली जात आहे वास्तविक पाहता रॉकेट या दारूच्या पेटी चे रेट 3125 असताना, ह्याच नावाचे लेबल चे गैरवापर करून नकली देशी दारूची पेटी 2800 रुपयात विक्री केली जात असून ही नकली देशी दारू विकणाऱ्याला फक्त 2300 रुपयात मिळत असल्याने अधिकचा नफा मिळवण्यासाठी अनेकांनी ही नकली दारू विक्रीचे काम बिनधास्त सुरू केले असल्याचे देखील बोलले जात आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात नकली देशी विदेशी दारूचे विक्रीचे प्रमाण वाढतच असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन घडत असलेला हा गैरप्रकार थांबवावा व दोषींवर कारवाई करावी असे देखील बुद्धिजीवी वर्गाकडून बोलले जात आहे. संबंधित विभाग या गैरप्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देतील काय किंवा त्यांना आशीर्वाद देतील असा टोलेबाज प्रश्नही नागरिकांकडून केला जात आहे,हे मात्र विशेष!