Home
Home चंद्रपूर *शासकीय मुलिंचे निरिक्षण गृह बालगृह, चंद्रपूर येथील बालिकांसाठी आर्ट ऑफ लिव्हींग मार्फत...

*शासकीय मुलिंचे निरिक्षण गृह बालगृह, चंद्रपूर येथील बालिकांसाठी आर्ट ऑफ लिव्हींग मार्फत तीन दिवसीय “बाल चेतना शिबीराचे आयोजन*

0
67

                              चंद्रपूर

                         हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर. (का प्र ) :- शासकीय मुलांचे निरिक्षण गृह बालगृह, चंद्रपूर येथील विधीसंघर्षग्रस्त बालिका व काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालिकांकरीता बाल न्यायमंडळ, चंद्रपुर व बाल कल्याण समिती, चंद्रपूर यांच्यामार्फत आर्ट ऑफ लिव्हींग यांच्याकडून तीन दिवसीय “बाल चेतना शिबीर” दि.11/०6/२०२५ ते दि.13/०6/२०२५ रोजी आदिवासी विकास विभागाच्या कार्लायातील भावनात आयोजित करण्यात आले. बाल न्यायमंडळ, चंद्रपूर व बाल कल्याण समिती, चंद्रपूर यांनी मुलांच्या सुदृढ मानसिक आरोग्याकरीता त्यांना ध्यानसाधना वयाच्या प्रत्येक गटांकरीता आवश्यक आहे, हा विचार करुन “बाल चेतना शिबीर” आयोजित करण्यात आले. सदर शिबीराच्या उद्घाटन करीता व अध्यक्ष स्थानी जिल्हा बाल न्यायमंडळ, चंद्रपूर प्रमुख न्यायाधीश सिमा अजय लाडसे, प्रमुख पाहुण्या स्थानी बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड.क्षमा बासरकर, बाल न्यायमंडळ सदस्य श्रीमती भावना देशमुख व श्रीमती मनिषा नखाते, तसेच बाल कल्याण समिती सदस्य श्रीमती वनिता घुमे व डॉ ज्योत्स्ना मोहीतकर हे हजर होते.  बाल कल्याण समिती चंद्रपूर अध्यक्ष क्षमा बासरकर यांनी नव चेतना शिबिराची प्रस्तावना प्रास्तविक प्रस्तुत केली. जिल्हा बाल न्याय मंडळ चंद्रपूर च्या प्रमुख न्यायाधीश माननिय श्रीमती लाडसे मॅडम यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाकरीता दैनंदिन जिवनातील छोटया छोटया गोष्टी तसेच मुलांकरीता कविता सादर करुन त्यांचे मार्गदर्शन केले. आर्ट ऑफ लिव्हींगमार्फत योग शिक्षक श्रीमती योगिता वानखेडे, पुजा चंद्रात्रे व हिमांशु रासोट यांनी तीन दिवस “बाल चेतना शिबीर” विधीसंघर्षग्रस्त बालक व काळजी व संरक्षण गरज असलेल्या मुलांकरीता पार पाडला. शिबीरामध्ये उपस्थीत असलेल्या बालकांना श्वासोच्छश्वासाचे प्रकार, प्राणायाम, सुर्यनमस्कार आणि ध्यान यांचे महत्व पटवून दिले. तसेच या शिबीरामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे, नेतृत्वगुण विकसीत करणे, तनावमुक्त व आनंदी जिवन जगण्यास सदरचे शिबीर उपयुक्त असल्याने त्यांनी सांगितले. शिबीरादरम्यान श्रीमती योगिता वानखेडे, पुजा चंद्रात्रे व हिमांशु रासोट यांनी मुलांकडून श्वासोच्छश्वास, प्राणायाम, सुर्यनमस्कार आणि ध्यान यांचा सराव करुन घेतला. मुलांनी दररोज ध्यान करावे असे देखील त्यांनी सांगितले. शिबीराच्या शेवटच्या दिवशी मुलांना त्यांचे अनुभव सांगितले. सर्व मुलांनी शिबीरात शिकविण्यात आलेले श्वासोच्छवांस, प्राणायाम, सुर्यनमस्कार आणि ध्यान याचा नियमीत सराव करण्याबाबत खात्री दर्शविली. शिबीराच्या यशस्वीतेकरीता बाल न्यायमंडळ, बाल कल्याण समिती, हृदय संस्था, बाल सौरक्षण कक्ष, शासकीय मुलांचे निरिक्षण गृह-बालगृह, चंद्रपूर व त्यांच्या कर्मचा-यांनी त्यांचे योगदान दिले. सदर कार्यक्रमाचे तीन दिवसीय सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हृदय सौस्थेचे क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे यांनी केले. शिबिरातील मुलांमधील उत्स्फुर्त प्रतिसाद पाहुन श्रीमती योगिता दिदी यांनी मुलांच्या आर्ट ऑफ लिव्हींग मधील पुढिल कार्यक्रम जाणुन घेण्यासाठी श्री.रविंद्र लाखे, रा. चंद्रपूर यांना ९८२२४६५३३९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगितले. 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                      *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here