चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(का प्र ) :- रोजी माननीय जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध दिनाचे व राष्ट्रीय बालक संरक्षण आयोग दिल्ली यांच्या अधिसूचनेप्रमाणे दिनांक 12 /6 /2025 पासून ते 15 ऑगस्ट 2025 पर्यंत या वेळेत पंधरा दिवसाचा सप्ताह बालकामगार धाडसत्रात करावयाचे आदेश देण्यात आले होते.
बालकामगार अधिनियम 1986 नुसार 18 वर्षाच्या बालकांना धोकादायक उद्योग प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे तसेच 14 वर्षे वर्षाखालील बालक बालिकांना कुठेही कामावर लावता येत नाही याबाबत हृदय संस्था असिस्ट जस्टिस प्रकल्पाचे वतीने तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, हृदय संस्थेचे काशिनाथ देवगडे हृदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे यांच्या सहकार्यातून आदिवासी विकास विभागाच्या सभागृहात सदर धाडसत्र कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बालकल्याण समितीच्या अध्यक्ष क्षमा बासरकर, प्रमुख पाहुणे म्हणून बालकामगार विभागाचे माथाडी सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष सचिन अरबट, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अजय साखरकर, निरीक्षण अधिकारी मुलींचे बालगृह राठोड मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात 18 वर्षे खालील बालकांना त्यांच्या पालकांना व उपस्थित मान्यवरांना कामगार कायद्याला धरून मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रम समाप्तीनंतर बालकामगार धाडसत्रासाठी जेटपुरा गेट ते गांधी चौक टीम रवाना करण्यात आली. प्रशिक्षणाचे दरम्यान गांधी चौक या प्रभागात 50 पेक्षा जास्त बालके दुकानात काम करत असल्याचे माहिती सर्वेक्षणातून आली होती त्या अनुषंगाने क्षेत्रिय अधिकारी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग जिल्हा कृती दल सदस्य शशिकांत मोकाशे यांनीटीम नेतृत्व केले. सदर टीम मध्ये हृदयसंस्थेच्या राणी मेश्राम समुपदेशिका, चाईल्ड लाईनच्या सुपरवायझर कल्पना फुलझले, प्रणाली इंदुरकर, क्षत्रिय अधिकारी रश्मी भोयर. यांच्या सह 25 भेट देण्यात आली व त्यातून 13 बालके बालिका प्राप्त झाले त्यापैकी 5 मुळे 4 मुली यांना सूचना पत्र देऊन बालकल्याण समिती समक्ष हजर राहण्यास ताकीद देण्यात आली. उर्वरित चार बालकांचे वयाचे पुरावे नसलेमुळे त्यांना सादर करण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता. धाडसत्राची माहिती सर्व दुकान मालकांना प्राप्त झाल्याने इतर दुकान मालकांनी त्यांच्याकडील अल्पवईन बाल कामगारांना दुकानातून काढून दिल्याचे दिसून आले. ही सदरची संपूर्ण कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर बाल कल्याण समिती अध्यक्ष क्षमा बासरकर व समिती सदस्य तसेच हृदय संस्थेचे संचालक काशिनाथ देवगडे यांच्या सहकार्यातून घडून आली.


























