Home
Home चंद्रपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन.

0
86

आमदार किशोर जोरगेवार यांची अधिकाऱ्यांसह नियोजन बैठक,

चंद्रपूर.(का प्र) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जुलै महिन्यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून रामबाग मैदानात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकारी आणि डॉक्टरांच्या संघांसोबत नियोजन बैठक घेतली.या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळेचंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवालजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेवराव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कराटेवनविभागाचे सहायक वनसंरक्षक विवेक नाटूइंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दीक्षितआचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे शिंगणेज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल वावडीकरनॅशनल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. पवन अगराडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारप्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोममाजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूरप्रकाश देवतळेअजय जयस्वाल, बलराम डोडानी, मनोज पालनामदेव डाहुलेसंजय बुरघाटेमाजी नगरसेवक प्रदीप किरमेसंदीप आवारीदेवानंद वाढईरवि गुरनूलेवंदना हातगावकरसविता दंढारेसायली येरणेराजेंद्र अडपेवारअमोल शेंडेराशिद हुसेननकुल वासमवारजितेश कुळमेथेकरणसिंह बैसमंगेश अहिरकर आदींची उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व विभागांनी समन्वय साधत काम करावे आणि शिबिरात रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल याची खात्री करावीअसे निर्देश दिले. शिबिराचे स्थळसुविधाआवश्यक वैद्यकीय उपकरणेऔषधे आणि पथकांची रचना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गरजू रुग्णांपर्यंत अधिकाधिक आरोग्य सेवा पोहोचवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या शिबिरासाठी महापालिका आरोग्य विभागशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयजिल्हा परिषद आरोग्य विभागज्युपिटर हॉस्पिटलसावंगी मेघेकस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्रामश्री सनवरलाल जोधपूर हॉस्पिटलइंडियन मेडिकल असोसिएशननॅशनल कॅन्सर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभणार आहे.शिबिराआधी रुग्णांची नोंदणी व प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. गंभीर आजार आढळल्यास शिबिराच्या दिवशी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि पुढील उपचार दिले जाणार आहेत. याबबत लवकर आरोग्य शिबिराची तारिख निश्चित करण्यात येईल असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                      *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here