चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(वि.प्र.): चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी विपिन पालीवाल यांची प्रपत्र बढती आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली असून विपिन पालीवाल यांची पदोन्नतीने आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आल्याने चंद्रपूर महानगर क्षेत्रात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, हे ही मात्र तेवढेच खरे!
विपिन पालीवाल यांची त्याच जागेवर पदोन्नती झाल्याने नागरिकाकडून समाधान व्यक्त केले जात आहे व बुद्धिजीवी वर्गाकडून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याची पावतीच पदोन्नतीच्या माध्यमातून त्यांना मिळाली असे देखील बोलले जात आहे , हे मात्र विशेष!
विपिन पालीवाल यांची प्रपत्र बढती नुसार आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याने साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चे संपादक सय्यद रमजान अली यांनी आयुक्त कार्यालयात जाऊन विपिन पालीवाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ, शाल देऊन त्यांचे स्वागत सत्कार करीत हार्दिक शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
विपिन पालीवाल यांची कार्यप्रणाली वाखाण्याजोगी असून चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या क्षेत्राचे विकास आता पुन्हा झपाट्याने होईल असे विश्वास देखील याप्रसंगी सय्यद रमजान अली यांनी व्यक्त केले.
विपिन पालीवाल यांच्या स्वागत सत्कार प्रसंगी साप्ताहिक कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली यांच्यासह हाजी अहमद शेख प्रामुख्याने हजर होते.
महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन आदेश क्रमांक: एमसीओ-२०२४/प्र.क्र.३३९/नवि-१४ मंत्रालय नुसार दिनांक ०६ जून, २०२५ रोजी
महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम, २०२१,दि.१४.०७.२०२१. संदर्भानव्ये शासन आदेश निर्गमित करण्यात आले असून या आदेशाप्रमाणे प्राधिकरणाच्या मान्यतेने विपिन पालीवाल यांची चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्तपदी प्रपत्र बढती करण्यात आल्याचा हा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार काढण्यात आला आहे.
























