HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का.प्र) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित Rajiv Gandhi College of Engineering, Research & Technology, चंद्रपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या वतीने Eco Pro Chandrapur यांच्या सहकार्याने बगल खिडकी ऐतिहासिक किल्ल्याच्या जतनासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
२५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजता आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. किल्ल्याच्या परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली तसेच ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ स्वच्छता करणे नसून, ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन आणि त्याबाबतची जाणीव समाजात निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत किल्ल्याच्या परिसराची स्वच्छता करत “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश दिला.
यावेळी Eco Pro Chandrapur चे बंडू धोत्रे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी किल्ल्याचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि जतन व संवर्धनाची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. महेश डुंबेरे, प्रा. आनंद डोनाल्ड व डॉ. नितीन जानवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची जाणीव अधिक दृढ झाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.























