भद्रावती,(का. प्र.) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांची बैठक केंद्रीय राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे, विविध उपक्रम सहकार्यकारी सदस्य शारदा खोब्रागडे, उके, जिल्हाध्यक्ष मारोतराव रायपुरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनात भद्रावती येथील साळवे हॉस्पिटल मधील अतिथी हॉलमध्ये नुकतीच पार पडली.
सदर बैठकीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुनर्गठन तालुका न्याय शाखा समिती व विविध उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातील प्रशासकीय यंत्रणेत कायदेविषयक धोरण व त्यांची अंमलबजावणी सामाजिक चळवळीच्या विषयावर रचनात्मक चर्चा करण्यात आली.
बैठकीत भद्रावती तालुका कार्यकारणीचे पुनर्गठन करण्यात येऊन कार्यकारणी घोषित करण्यात आली.
यात डॉ.राहुल साळवे यांची पुनश्च एकमताने तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांची सल्ला मार्गदर्शक, सोशल मीडिया प्रमुख पदी, लता टिपले तालुका उपाध्यक्ष, सुरेखा रामटेके तालुका कार्याध्यक्ष, चंद्रकांत पोईनकर तालुका सचिव, भैय्यालाल भैसारे, प्रीती मेश्राम बुवाबाजी संघर्ष विभाग, राजेंद्र पाटील, महादेव कोल्हे वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प, शर्मिला मंडल मानसिक आरोग्य विभाग, चंद्रकला गेडाम ,मुक्ताबाई पेटकर महिला सहभाग, श्रीधर भगत ,अमोल दासलवार ,रतन पेटकर युवा आणि विवेक वाहिनी, नामदेव रामटेके, अशोक जवादे प्रशिक्षण विभाग, अनिता भदभूजे, रवी वानखेडे सांस्कृतिक विभाग, जय ठाकरे ,भारत मडावी जातीअंत विभाग, कमलकांत कळस्कर, सौरभ चामाटे विविध उपक्रम विभाग अँड. छबुताई रामटेके कायदा विभाग आधी विविध विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र अंनिस तालुका विभाग पदी निवड करण्यात येऊन भद्रावती तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली.
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*