Home
Home चंद्रपूर वातानुकूलित व्यवस्था व संगणक सुविधांनी सुसज्ज होणार बाबूपेठची अभ्यासिका – आ. किशोर...

वातानुकूलित व्यवस्था व संगणक सुविधांनी सुसज्ज होणार बाबूपेठची अभ्यासिका – आ. किशोर जोरगेवार. आ. किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी; मनपा अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना.

0
22

HELLO CHANDA NEWS

     चंद्रपूर,(का. प्र.) :विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि आधुनिक वातावरणात अभ्यास करता यावा, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून बाबूपेठ येथील महादेव मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली.

  यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

   यावेळी तुषार सोम, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, अमोल नालमवार, सद्गुरू  व्यासम प्रसारक मंडळाचे लोकेश बोरकर, प्रवीण ईटनकर, मनोज टिकले, राकेश पायपरे, पुंडलिक मेश्राम, गंगाधर बावणे, राजू येरणे, प्रवीण नागरकर, मोरेश्वर टिकले, सुनील रागीट, अशोक पेटकर, वेदांत अलमस्त यांच्यासह बाबूपेठ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   बाबूपेठसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना शहरातील इतर भागात जावे लागत होते.

       ही अडचण लक्षात घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसरात सुसज्ज अभ्यासिका उभारण्याचा निर्णय घेतला होता.

आता ही अभ्यासिका अंतिम टप्प्यात असून लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे.

         यावेळी पाहणीदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

 विशेषतः वातानुकूलित व्यवस्था, संगणक सुविधा, प्रशस्त बैठक व्यवस्था, प्रकाश व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांना शांत वातावरण मिळेल यासाठी आवश्यक अनुषंगिक कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगत आ. जोरगेवार यांनी शिक्षण क्षेत्रात दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले.

    ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहरातील मोठ्या अभ्यासिकांप्रमाणे सुविधा आपल्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  ही अभ्यासिका सुरू झाल्यानंतर बाबूपेठ व परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून अभ्यासासाठी दूरवर जाण्याची गरजही टळणार आहे.

       तसेच सदर इमारत दोन मजली असून तळमजल्यावर व्यायामशाळा असणार आहे.

         यात महिलांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here