*रय्यतवारी घरात पडला २० फुट खोल गड्डा,पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या सुचनेप्रमाणे पुर्व मंडळ पदाधिका-यांनी केली घटना स्‍थळाची पाहणी*

0
31

===============================

चंद्रपूर पूर्व मंडळ बंगाली कॅम्‍प येथील रय्यतवारी कॉलरी भागातील बिएमटी चौक आमटे प्‍लॉट येथे राहणारे सुरेश माधव शिवनकर यांचे स्‍वतःचे घर आहे. त्‍या घरातील बैठक रुम मध्‍ये दिनांक ०१ ऑगस्‍ट २०२४ रोज गुरुवारला ९ X ११ फुट जागेत २० फुट खोल गड्डा पडला. तेव्‍हा सुदैवाने घरात कोणीही व्‍यक्‍ती नसल्‍याने कुठलीही अप्रीय घटना घडली नाही. सदर घटनेनंतर सुरेश शिवनकर यांची सुन संगीता पवन शिवनकर ह्या घराचा दरवाजा खोलुन आत प्रवेश केला तेव्‍हा त्‍यांना मोठा गड्डा असल्‍याचे नजरेस पडले. त्‍या गड्याच्‍या काठावर उभे राहून डोकावुन पाहण्‍याचा प्रयत्‍न केला तेव्‍हा त्‍यांचा तोल जाऊन त्‍या गड्यात पडल्‍या व त्‍यांच्‍या पाठोपाठ मागे असलेला त्‍यांचा पाळीव कुत्रा हा सुध्‍दा गड्यात पडला. हे दृश्‍य मागे असलेल्‍या परीवारातील इतर व्‍यक्‍तींनी बघताच आरडा ओरड करीत तात्‍काळ महिलेला व कुत्र्याला सिडीचा उपयोग करुन गड्यातुन बाहेर काढले. या सर्व घटनेनी परिवारात एकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बातमी जिल्‍ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना कळताच त्‍यांनी तात्‍काळ पुर्व मंडळ परिसरातील भाजपा पदाधिकारी यांना सदर घटनेची पाहणी करुन मदत करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. त्‍याप्रमाणे पुर्व मंडळ अध्‍यक्ष दिनकर सेामलकर त्‍यांच्‍यासह बि.बि. सिंह, प्रलय सरकार, महेंद्र जुमडे, महेश झिटे, धम्‍मप्रकाश भस्‍मे, धनराज कोवे, मनोज पोतराजे, रुद्रनारायण तिवारी, चंदन पाल, गिरीष गुप्‍ता, डॉ. शंकर तोकल, लक्ष्‍मण दास, उदय प्रताप सिंह, विनोद गुप्‍ता, सुरेंद्र सोनकर, प्रविण गुरमवार, बाबु यादव, सुभाष देवाळकर, सुरेंद्र प्रसाद, पवन शिवनकर या सर्व पदाधिका-यांनी घटनेची माहीती घेतली व पाहणी केली यांची विस्‍तृत माहीती दिनकर सोमलकर यांनी महानगर जिल्‍हाध्‍यक्ष राहुल पावडे यांना दिली.   ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ==============================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here