Home
Home चंद्रपूर आत्मविश्वास पाहून आमदार जोरगेवार म्हणाले, ‘तू पुन्हा धावशील’ अपघातात पाय गमावलेल्या...

आत्मविश्वास पाहून आमदार जोरगेवार म्हणाले, ‘तू पुन्हा धावशील’ अपघातात पाय गमावलेल्या पूजाची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट

0
82

===============================

आत्मविश्वास पाहून आमदार जोरगेवार म्हणाले, ‘तू पुन्हा धावशील’ ===============================  अपघातात पाय गमावलेल्या पूजाची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट   ================================                       *चंद्रपूर*        ===============================

16 जुलै ला  दुचाकीने जात असलेल्या पूजा हलदार हिचा अपघात झाला होता. या अपघातात तिला एक पाय कायमचा गमवावा लागला. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी पूजाच्या खुटाळा येथील राहत्या घरी तिची भेट घेतली. या भेटीदरम्यान, अपघात होऊनही पूजामध्ये ओढावलेल्या परिस्थितीवर मात करण्याचा आत्मविश्वास दिसत होता. हा आत्मविश्वास पाहून, “पूजा, तू पुन्हा धावशील,” असे उद्गार आमदार जोरगेवार यांच्या तोंडून निघाले, आणि पूजाच्या चेहऱ्यावर हसू फुलले.      =============================           खुटाळा येथील रहिवासी असलेली पूजा पडोली येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी कामावरून घरी परतत असताना पूजाची स्कूटी स्लिप होऊन ती खाली पडली. यावेळी मागून येणाऱ्या ट्रकचा तिच्या पायाला धक्का लागल्याने तिला एक पाय कायमचा गमवावा लागला. मात्र, अपघातग्रस्त अवस्थेतही पूजाने धीर न हारता घरच्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि स्वतःच रुग्णालयात जाण्यासाठी ऑटो थांबवले. नंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. परंतु, पायाची स्थिती गंभीर असल्याने तिचा पाय कापावा लागला.     ============================                     या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी तिच्या राहत्या घरी भेट दिली. पूजाने त्यांना अपघाताचा संपूर्ण प्रसंग सांगितला. घरची परिस्थिती हलाखीची असूनही, खचून न जाता लवकर बरी होऊन पुन्हा कामावर जाण्याचा निर्धार तिने व्यक्त केला. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रसंगातही पूजाचा आत्मविश्वास आणि तिचे धाडस वाखाणण्याजोगे आहे. पूजाचे हे धाडस दिव्यांगत्व आल्यामुळे निराश झालेल्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.     =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    =================================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here