==============================
*_मा.खा.अशोकजी नेते यांची शपथविधी सोहळ्यास उपस्थिती: नागरिकांनी जल्लोष साजरा करावा_*
आज, ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती.
भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते या सोहळ्यास विशेष उपस्थित होते. त्यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रातील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या ऐतिहासिक प्रसंगी फटाके व मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्याचे आवाहन केले.
या शपथविधीनंतर मा.खा.अशोकजी नेते यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे व मा.ना.श्री. अजित दादा पवार यांचे अभिनंदन करत राज्याच्या विकासासाठी या तिघांचे नेतृत्व महत्वाचे ठरेल, असे यावेळी आपल्या भावना व्यक्त करत
नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक क्षणाचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा करावा आणि राज्याच्या प्रगतीसाठी आपल्या योगदानाची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी करत हा शपथविधी सोहळा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा पाया ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*