Home
Home चंद्रपूर मृत्यमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लक्ष रुपयांची आर्थिक...

मृत्यमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लक्ष रुपयांची आर्थिक मदत करा ! आ.सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

0
59

================================

                              चंद्रपूर 
                      हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या परिवारांवर मोठा आघात झाला आहे. अशा परिस्थितीत त्या तिनही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतीक कार्य मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासोबतच माननिय मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या सोबत मदतीसंदर्भात दूरध्वनीवर चर्चा केली आहे.

१० मे रोजी गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी गोपाल गणेश साखरे (बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (शिर्डी, अहिल्यानगर)  व स्वप्निल उद्धवसिंह शिरे (छत्रपती संभाजीनगर) हे तिघे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेले व तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. या तिघांनी नुकतीच वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात केली होती. समाजसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला होता. मात्र, काळाच्या क्रूर आघाताने त्यांचे स्वप्न अर्धवट राहिले.

या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत या तिनही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मा. मुख्यमंत्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली.

यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून माननीय मुख्यमंत्री. फडणवीस यांच्याशी संवाद साधून आर्थिक मदतीबाबत चर्चा केली असून, यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांना मा. मुख्यमंत्री यांनी मदत करण्याबाबत आश्वस्त केले आहे.

या कुटुंबांवर कोसळलेला हा आघात फार मोठा आहे. शासनाच्या मदतीने त्यांच्या दुःखात थोडा तरी दिलासा मिळावां हीच भावना आ.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.      ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   

===============================                 *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069**बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here