Home
Home Breaking News अंमली पदार्थ एम. डी. ड्रग्स पावडर विकणाऱ्या ईसमाविरूध्द चंद्रपुर शहर पोलीसांनी केली...

अंमली पदार्थ एम. डी. ड्रग्स पावडर विकणाऱ्या ईसमाविरूध्द चंद्रपुर शहर पोलीसांनी केली कार्यवाही!

0
92

=================================

                             चंद्रपूर

                        हॅलो चांदा न्युज

चंद्रपुर(का.प्र.): पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक १५/ ०५/२०२५ रोजी डि.बी. पथक अधिकारी व पो. स्टॉफसह पो.स्टे. परिसरात पेट्रोलींग करित असता मुखबीरद्वारे खबर मिळाली की, शासकिय डि.एड. कॉलेज ग्रॉउंड बाबुपेठ वार्ड चंद्रपुर येथे एक इसम एम.डि. ड्रग्स पॉवडर विक्री करिता घेउन येणार आहे, अशा खात्रीशीर खबरेवरून पो.नि. प्रभावती एकुरके यांचे मार्गदर्शनात पो. स्टॉफ, पंच, वजन मापधारक, फोटोग्राफर सह असे मिळुन मिळालेल्या माहितीप्रमाणे घटनास्थळी कारवाई करणे करीता पोहचले असता, एक इसम संशयीतरित्या वावरत असता मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेउन त्याची पंचासमक्ष कायदेशीररित्या अंगझडती घेतली असता, त्याचे पॅन्टचे खिशात १) दोन लहान प्लॉस्टीक पिशवीत एम.डि. पॉवडर ९.०४० ग्रॅम वजन असलेला किंमत ४५,००० रू. २) आरोपीची एक निळ्या रंगाची मोपेड गाडी सुझुकी एसेस एम.एच.३४ सि.इ. ७१९५ किंमत ७०,००० रू. असा एकूण १,१५००० रू. चा माल जप्त करण्यात आला. आरोपी नामे महेश सुबोध बाला, वय २४ वर्ष, रा. जुनोना चौक, बाबुपेठ वार्ड चंद्रपुर हा पांढरा रंगाचा एम. डी. ड्रग्स पावडर ताब्यात बाळगुन स्वतःचे अर्थिक फायद्याककरिता विक्री करित असताना मिळुन आल्याने त्याचे विरूध्द अप. क्र. ३४४/२५ क. ८(C),२२ (B) NDPS ACT १९८५ अन्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर कार्यवाही चंद्रपुर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन , अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, पोउपनि. संदिप बच्छीरे, म.पो.हवा. भावना रामटेके, पो.हवा. सचिन बोरकर, संतोष कनकम, संजय धोटे, नापोशि. कपुरचंद खरवार, पो.अं. इम्रान खान, इरशाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रूपेश पराते, मपोशि. सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केलेली आहे -पुढील तपास स.पो.नि. राहुल ठेंगणे पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर करित आहे.         ==============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ================================             *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                           *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here