Home
Home चंद्रपूर बाळुभाऊ यांच्या जाण्याने निर्भीड युवा नेतृत्व हरपल्याचे दुःख – आ. किशोर जोरगेवार

बाळुभाऊ यांच्या जाण्याने निर्भीड युवा नेतृत्व हरपल्याचे दुःख – आ. किशोर जोरगेवार

0
78
                          चंद्रपूर 
                    हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(का प्र) :- आठवणीतले बाळुभाऊ… द्वितीय पुण्यस्मरण सोहळा हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी आहे. बाळु धानोरकर हे एक निस्वार्थ, प्रामाणिक आणि धडाडीचे नेते होते. त्यांच्या जाण्याने चंद्रपूर जिल्ह्याने एक सक्षम युवा नेतृत्व गमावले असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवाराच्या वतीने वरोरा येथे “आठवणीतले बाळुभाऊ” द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, विनोद दत्तात्रय यांची उपस्थिती होती.
शिवसेनेत सोबत काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या जिद्दीने, काम करण्याच्या पद्धतीने नेहमीच ते कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श नेता राहिले. त्यांचे स्पष्ट विचार, कुठल्याही गोष्टीत सडेतोड भूमिका घेण्याची त्यांची शैली कायमच प्रेरणादायी राहिली. त्यांच्या स्वप्नांचा सन्मान करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवे. त्यांनी कधीही कुठल्याही संकटापुढे हार मानली नाही. बाळु धानोरकर यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. 
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here