Home
Home चंद्रपूर *सफाळ्यामध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण.*

*सफाळ्यामध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण.*

0
80

                          पालघर       

                  हॅलो चांदा न्युज

पालघर.(का प्र) :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सफाळ्यातील एक झाड देशासाठी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे, उपकेंद्र तांदुळवाडी, व एम एस ई बी ऑफिस सरतोडी या ठिकाणी जाऊन वृक्षारोपण केले.
जागतिक पर्यावरणाच्या दिनाचे निमित्त साधून वृक्षमित्र प्रकाश काळे व त्यांचे सहकारी जगदीश किणी, अनिल घरत, महेंद्र ठाकूर, शरद घरत  , सुजित पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.व त्या नंतर विविध ठिकाणी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे येथे भेट देऊन  डॉ.विश्वकर्मा, त्यांचे, सहकारी   यांच्या उपस्थितीमध्ये कडुलिंब व बकुळी ह्या झाडांचे  वृक्षारोपण केले. यावेळी  प्रकाश काळे यांनी वृक्षांविषयीची अतिशय सुंदर माहिती उपस्थिताना दिली. डॉ. विश्वकर्मा यांनी देखील या संपूर्ण टीमचे आभार मानले. तांदुळवाडी उपकेंद्र येथे देखील डॉक्टर इंगळे व त्यांच्या टीम समवेत वृक्षारोपण करण्यात आले.  त्या ठिकाणी देखील  जगदीश किणी व वृक्ष मित्र प्रकाश काळे वृक्षांविषयी व आपल्या कार्याविषयी  सविस्तर माहिती दिली. त्यानंतर एम एस सी बी ऑफिस  सरतोडी या ठिकाणी  शरद घरत, एम एस सी बी चे वाघ व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण केले व खऱ्या अर्थाने जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. व सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                        *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*सहसंपादक:- राजेश मेश्राम*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here