मुल
हॅलो चांदा न्युज
मुल(का.प्र.): हकीकत याप्रमाणे आहे की दिनांक ०८/०६/२०२५ रोजी दुपारी मिळालेल्या गोपनिय बातमी वरून पो. स्टे. मुल कार्यक्षेत्रा अंतर्गत असलेले स्मशान भुमी जवळ मौजा चक फुटाणा ता. पोंभुर्णा जि. चंद्रपुर सार्वजनिक ठिकाणी वेळ १७:३० वा पंच व पोलीस स्टॉफसह रेड केली असता, काही ईसम कोंबडयांच्या पायांना काती बांधुन त्यांची झुंज लावुन त्यावर पैशांची बाजी लावुन कोंबडयांचा व पैशांचा हारजितचा जुगार खेळीत असतांना दिसुन आले. ते पोलिसांना पाहुन पळत असता पोलिसांनी पाठलाग करून नमुद कोंबडा बाजार जुगार खेळणारे तिन ईसमांना पकडले. उर्वरीत १० जुगारी ईसम हे त्यांचे वाहन मौक्यावर सोडुन पळून गेले.
घटनास्थळी पळुन गेलेले जुगारी ईसमांचे मोटार सायकल व कालीपिली वाहने तसेच मिळुन आलेले पाच कोंबडे व २० लोखंडी धारधार कात्या व पकडण्यात आलेले जुगारी ईसम यांचे अंगझडती मध्ये नगदी रूपये असे एकुण ७,२४,७००/-रू चा माल मिळुन आल्याने पोलीस स्टेशन मुल येथे एकुण १३ आरोपीतांवर अपराध क. २१५/२०२५, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस स्टेशन
मुल येथे
अप. क्र. २१५/२०२५ नुसार
कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे
फिर्यादी पो.हवा
जमीरखान पठाण ब. न. २४९ पो स्टे मुल यांच्या तक्रारीनुसार
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव (अतिरिक्त कार्यभार उपविभाग मुल),
स.पो.नि. सुबोध वंजारी (प्रभारी अधिकारी पो. स्टे. मुल)यांच्या मार्गदर्शनात
गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही
पोलीस स्टेशन मुल
स.पो.नि. अमितकुमार आत्राम,पो.हवा. भोजराज मुंडरे, ब. न. २३९७, पो.हवा. जमीरखान पठाण, ब न २४९,पोहवा प्रशांत गायकवाड ब न ६५७, पोहवा सुनिल कुळमेथे ब न ५२२,पो.अं. नरेश कोडापे, ब न १८३,
पोअं वेदनाथ करंबे, ब न ५८५,
पो अं पंकज बगडे ब न १६१५,
पोअं गणेश मेश्राम ब न १७७६,
चा.पो.अं. शिवशंकर डुकरे ब न ६०४३ यांनी केली असून ही करवाइ
दिनांक ०८/०६/२०२५ चे १७.३० वा. ते १८:३० वाजता दरम्यान दिनांक ०९/०६/२०२५चे ००:५० वाजता पर्यंत स्मशानभुमीजवळ, मौजा चक फुटाणा या घटनास्थळ वर करण्यात आली असून आरोपी
१)संजय रामदास सोनटक्के वय ४५ वर्ष जात खाती, रा चकफुटाणा,२) प्रविण चरणदास सोनटक्के वय ३५ वर्ष जात खाती रा देवाळा खुर्द दोन्ही ता पोंभुर्णा जि. चंद्रपुर, ३) भिमा शंकर पेंदोर वय ३४ वर्ष रा कवडजई ता बल्लारशा जि. चंद्रपुर या तिघांसह ईतर १० आरोपीवर कारवाई करण्यात आली.
खालीलप्रमाणे मिळुन आलेला माल १) ०९ मोटार सायकल प्रत्येकि किंमत ५०,०००/- असा एकुण ४,५०,०००/-
२) एक टॅक्सी वाहन किं अंदाजे २,५०,०००/-रू
३) आरोपींताचे अंगझतीमध्ये एकुण २,४००/-रू
४) पाच जखमी कोंबडे किं. एकुण-१,३००/-रू
५) २० लोखंडी धारधार कात्या किं १,०००/-रू असा एकुण ७,२४,७००/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला हे मात्र विशेष!

























