Home
Home गडचिरोली गुरदास कामडी यांना उत्कृष्ट अधिसभा(सिनेट)सदस्य पुरस्कार प्रदान.

गुरदास कामडी यांना उत्कृष्ट अधिसभा(सिनेट)सदस्य पुरस्कार प्रदान.

0
252

 HELLO CHANDA NEWS

        गडचिरोली.(का.प्र.) : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली १४ वा वर्धापन दिन सोमवार दिनांक ६ आक्टोंबर २०२५ रोजी गोंडवाना विद्यापीठाचे नविन सभागृह येथे , विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे अध्यक्षतेखाली, तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सपंन्न झाला.
गोंडवाना विद्यापीठाने विविध समाजपयोगी विविध उपक्रम राबवून समाजाला नवी दिशा दिलेली आहे. विद्यापीठ केवळ पदवी शिक्षण देणारे नसून, माणसाच्या जीवनाला आवश्यक असणारे जीवनकौशल्य देणारे विद्यापीठ म्हणून कार्यरत आहे. विद्यापीठाच्या १४ व्या वर्धापन दिनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करित असतांना त्यापासून पुढच्या पिढीने प्रेरणा घ्यावी. अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त केले.

         या सोहळयात विद्यापीठाद्वारे देण्यात येणारा जीवनसाधना उत्कृष्ट अधिसभा सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

          गोंडवाना विद्यापीठ विविध शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी बहुल भागातील जिज्ञासा बुध्दीमानतेला चालना देण्याचे काम करित आहे. विविध आध्यासनाच्या माध्यमातून राष्ट्र पुरुष व समाजसुधारकांचे विचार युवापिढी पर्यंत पोहचविण्याच काम करित आहे. हे अभिमानास्पद आहे. असे प्रमुख अतिथी पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम अशी भावना व्यक्त केली.
सन २०२५ चा उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांना सन्मानपत्र व रुपये १५००० राशी देवून पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
गुरदास कामडी २०१० ते २०१५ या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य म्हणून पदवीधर मतदार संघातून निर्वाचित झालेले होते.

                      या काळात विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रश्न अधिसभेत मांडलेले आहेत.२०१४ ते २०१७ या कालावधीत गोंडवाना विद्यापीठाच्या शारिरीक शिक्षण व क्रीडा बोर्डाचे सदस्य म्हणून काम केलेले आहे.सप्टेंबर २०२२ ला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट मध्ये पदवीधर मतदार संघातून निर्वाचित झालेले आहेत. विद्यापीठाच्या सिनेटमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सभागृहात उपस्थितीत केलेले आहेत. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा, क्रीडा स्पर्धा आयोजनात सुधारणा यासारख्या प्रश्न सभागृहात लावून धरलेले आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, खरेदी समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठा ७ विविध अध्यासनाचे सदस्य आहेत.
गुरुदास कामडी यांना यापूर्वी भारत शिक्षण रत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक, महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गुरुदास कामडी यांना उत्कृष्ट अधिसभा( सिनेट) सदस्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतजी बोकारे,प्र-कुलगुरु डॉ. श्रीरामजी कावळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत मोहीते, डॉ. लेमराज लडके,डॉ. संजय गोरे,डॉ. विवेक गोर्लावार, प्रशांत दोंतुलवार, डॉ. नंदाजी सातपुते,डॉ. रंजना लाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here