Home
Home चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात बाल विवाह मुक्त रथाला हिरवी झेंडी. बालविवाह मुक्ती रथ अभियानास...

चंद्रपूर जिल्ह्यात बाल विवाह मुक्त रथाला हिरवी झेंडी. बालविवाह मुक्ती रथ अभियानास प्रारंभ.

0
189

 

HELLO CHANDA NEWS

   चंद्रपूर,(का. प्र.) : रूरल अँड अर्बन डेवलपमेंट यूथ असोसिएशन (रूदय) गडचिरोली एक्सेस टू जस्टिस प्रकल्प व महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा सरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलनाच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘बालविवाह मुक्ती रथ अभियाना’ ची अधिकृत सुरवात शनिवारला करण्यात आली.

या अभियानाचे उद्घाटन आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

           यावेळी रूदय संस्थेचे संचालक काशीनाथ देवगडे, प्रकल्प व्यवस्थापक प्रिया कांबळे, राणी मेश्राम समूपदेशिका, क्षेत्रिय अधिकारी शशिकांत मोकाशे, रश्मी भोयर, सोनम लाडे,सोमेश निशाने,कविंद्र नागापुरे जिल्हा चाईल्ड हेल्पलाईनचे अभिषेक मोहुर्ले,अंकुश उराडे,दिपाली मसराम उपस्थित होते.

           किशोर जोरगेवार आमदार यांचे कार्यालय चंद्रपूर येथे माजी जिल्हाध्यक्ष तसेच नवनिर्वाचित नगरसेवक सुभाषभाऊ कासनगोट्टीवार जिल्हा महिला बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे बालकल्याण समिती सदस्या वनिता घुमे यांच्या हस्ते बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत चित्ररथ व स्वाक्षरी या रथाला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

          चित्ररथ चंद्रपूर जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिक, कुटुंब, धर्मगुरु यांच्यापर्यंत बालविवाह मुक्त जिल्हा हा संदेश देण्याच्या उद्देश्याने हा रथ जिल्हाभर फिरवण्यात येणार आहे. बालविवाह करणे एक कायदेशीर गुन्हा असून मुलांचे बालपण वाचण्याचे संदेश देऊन, मुलांच्या शिक्षण आरोग्य यावर मुलांना जागरूक करण्याचे काम चंद्रपूर जिल्हाभरात रुदय संस्थामार्फत केले जात आहे.

      केंद्र व राज्य सरकार यांच्यामार्फत बालकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून वंचित कुटुंबांना सर्व शासकीय योजनेला जोडण्याचे काम रुदय संस्थेमार्फत जाणीव जागृती उपक्रम राबविले जात आहे.

     हा रथ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात शाळा महाविद्यालय उद्याने पोलीस स्टेशन सार्वजनिक ठिकाणी फिरून बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा-२००६ संदर्भात नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.

                  बालविवाहाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाईन सेवा, संरक्षण यंत्रणा व प्रशासकीय कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

  जिल्ह्यातील विविध तालुके व ग्रामपंचायतींमध्ये पुढील काही आठवड्यांपर्यंत हा रथ फिरणार असून, बालविवाह रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

                 यशस्वीपणे हे अभियान राबविण्यासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, बाल कल्याण समिती सदस्य वनिता घुमे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर तसेच रूदय संस्थेचे संचालक काशीनाथजी देवगडे यांचे मार्गदर्शन व सहकार्याने कार्यक्रमाचे थाटात उदघाटन करण्यात आले.

     सदर रात्रीच्या आयोजनासाठी हृदय संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले सदरात यात्रा कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन व समापन शशिकांत मोकाशे यांनी त्या सायंकाळी राजुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी राजुरा यांच्या समक्ष त्या दिवशीचा प्रवास थांबविण्यात आला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here