Home
Home चंद्रपूर तलवारीसह इसम अटकेत : गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असताना. कोठारी येथील घटना.

तलवारीसह इसम अटकेत : गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असताना. कोठारी येथील घटना.

0
167

HELLO CHANDA NEWS

       बल्लारपूर,(वि. प्र.) : धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर गस्तीदरम्यान तलवारीसह संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका इसमाला संभाव्य गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी अटक केली. आरोपी रामदास सुधाकर ताजणे (वय ३२), रा. कोठारी वॉर्ड क्र. १, ता. बल्लारपूर विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई कोठारी पोलीस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी ३ मार्च २०२६) केली.

   मिळालेल्या माहितीनुसार, कोठारीचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना मारोती महाविद्यालयालगत सामाजिक सभागृहाजवळ, कोठारी-कवडजई मार्गावर एक इसम तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

  तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना संबंधित इसम संशयित हालचाली करताना आढळला.

      त्यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता शर्ट च्या खाली लपवून ठेवलेली लोखंडी तलवार आढळून आली. संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून तलवार जप्त करण्यात आली.

   सदर कारवाई कोठारी चे ठाणेदार योगेश खरसान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश रामटेके, राजेश चिताडे, पोअं शंकर जंबे, गणेश देठे, राजु पोरते यांनी केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here