Home
Home चंद्रपूर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील विचारमंचकडून हृदयस्पर्शी कौतुक. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी उचलले ऐतिहासिक पाऊल. धाराशिव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच कडून आ. मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता.

0
80

HELLO CHANDA NEWS

       मुंबई,(वि. प्र.) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच विधानसभेत केली.

ही मागणी अत्यंत ऐतिहासिक आणि राष्ट्रप्रेमी दृष्टिकोनातून केली गेलेली आहे.

           या मागणीमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाला योग्य सन्मान मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू होईल, याबद्दल धाराशिव जिल्ह्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंचचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी पत्र लिहून आ.मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आहे.

         स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बलिदानाचे महत्त्व सांगणारा प्रत्येक पाऊल राष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक अमूल्य ठेवा आहे.

    आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या या मागणीमुळे सावरकरप्रेमी जनतेमध्ये विश्वास आणि आदर वाढला आहे.

           आ. मुनगंटीवार यांच्या या ऐतिहासिक पावलाला आम्ही एक आदर्श म्हणून स्वीकारतो, असे मकरंद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

        स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच, कळंब (जिल्हा धाराशिव) कडून आम्ही आ. मुनगंटीवार यांचे अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या कार्याचे स्वागत करत, त्यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कळंब येथील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करतो.

  यावर्षीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कळंब येथील कार्यक्रमात आ. मुनगंटीवार यांची उपस्थिती आमच्यासाठी अभिमानाची बाब ठरेल, असे भावनिक उद्गार पाटील यांनी काढले आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here