HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील बिएस्सी द्वितीय वर्षाच्या विद्याथ्र्यांनी व्यापक शिक्षण कार्यक्रम (सी.ई.पी (सी.ई.पी.) या शैक्षणीक अभ्यासाअंतर्गत छोटुभाई पटेल हायस्कूल चंद्रपूर येथे ६ मार्च २०२६ जागरूकता अब कार्यक्रम आयोजीत केला.
तसेच जैवतंत्रज्ञान विभागातील विदयार्थ्यांनी 6 मार्च 2026 रोजी लोकमान्य टिळक कन्या विद्यालय ला देखील भेद दिली. सदर उपक्रम सरदार पटेल महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर तसेच शुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. व्हि.एस. वाढई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या उपक्रमादरम्यान बिएस्सी द्वितीय वर्षातील विदयार्थ्यांनी शाळेतील सहावी ते नववीतील विद्यार्थ्यानांसाठी जागरूकता कार्यक्रम आयोजीत केला सदर कार्यक्रमामध्ये अन्न भेसळ, ए.बी.ओ. रक्तगट प्रणाली, वैयक्तीक स्वच्छता आणि सुक्ष्मजीव संसर्ग, सिकलसेल आजाराच्या संदर्भात अनुवांशिक विकार, शाबद्दल प्रात्यक्षीक देखील करून दाखविण्यात आले.
या भेटीदरम्यान महाविदयालयातील प्रा. सुफ्रा शेख, प्रा. हर्षदा बावरे, प्रा. मीस्बा सय्यद प्रा. वैश्नवी हलकरे तसेच सुक्ष्मजिवशास्त्र विभागातील विद्यार्थी मोढ्या संख्येने उपस्थीत होते.
‘उपरोक्त उपक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष. अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष. सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष श्रीमती सगुणा तलांडी सचिव. प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, कोशाध्यक्ष. संदीप गड्डमवार व सन्माननीय सदस्य. राकेश पटेल, एस. रमजान, सुरेश पोटदुखे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, विभागातील इतर प्राध्यापक वृद यांनी यशाबद्दल अभिनंदन केले.























