Home
Home चंद्रपूर सरदार पटेल महाविदयालय, चंद्रपूर येथे पी.सी.आर  व आर.एफ.एल.पी.पद्धतीवर प्रात्यक्षीक कार्यशाळा संपन्न.

सरदार पटेल महाविदयालय, चंद्रपूर येथे पी.सी.आर  व आर.एफ.एल.पी.पद्धतीवर प्रात्यक्षीक कार्यशाळा संपन्न.

0
80

HELLO CHANDA NEWS

             चंद्रपूर,(का. प्र.) : सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे सुक्ष्मजीवशास्त्र आणि हायमिडीया लॅबोरेटरीज यांच्या संयुक्त विदयमाने दि. 13 मार्च २०२६ रोजी पी.सी.आर. व आर.एफ.एल.पी. संशोधन पध्दतीवर प्रात्यक्षीक कार्यशाळा संपन्न झाली.

  सदर कार्यक्रमाला सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.  डॉ. व्ही. यु. थुल डॉ. पि. आर.  बोरकर तसेच हायमिडीया लॅबोरेटरीज मुंबईचे संशोधन प्रमुख विश्वाजीत पाईकराव व संजीव सिंग आदी उपस्थीत होते.

            कार्यक्रमादरम्यान डॉ. व्ही. यु. थुल तसेच डॉ. पी. आर. बोरकर यांनी आजच्या युगात विदयार्थ्यांना संशोधनाकरीता आवश्यक टेक्नीक्स कशाप्रकारे केल्या जातात व व विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये कसा उपयोग करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमामध्ये पी.सी.आर. व आर.एफ.एल.पी. चे महत्व व ती टेक्नीक्स, कशाप्रकारे करतात याबद्दलचे  प्रात्यक्षिक हायमिडीया लॅबोरेटरीज चे टेक्नीशियन विश्वाजीत पाईकराव यांनी करून दाखविले. कार्यक्रमामध्ये पदवी, पदव्युत्तर विभागाचे विदयार्थी तसेच प्राध्यापक उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे संचालन कु. प्रतिक्षा चंदनखेडे तर आभार प्रदर्शन प्रा. यशश्री निवलकर यांनी केले.

                        यावेळी डॉ. वैशाली शुल,  डॉ. प्रकाश बोरकर, प्रा. स्वाती मनकेवार,  प्रा. पूनम ठाकरे, प्रा. सोनाली गोहोकर, प्रा. भाग्यश्री शेंडे. शिवानी केशटीवार, त प्रा. काजल गोहाने प्रा. नताशा शेख, प्रा. यशश्री निवलकर प्रा. हर्षदा बावरे, वैष्णवी हलकरे, प्रा, सुफ्रा शेख प्रा. मिसबा सय्यद, उपस्थीत होते.

     ‘उपरोक्त उपक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष,  कार्यकारी अध्यक्ष किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष श्रीमती सगुणा तलांडी सचिव प्रशांत पोटदुखे,  सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, कोशाध्यक, संदीप गड्डमवार व सन्माननीय सदस्य, राकेश पटेल,   एस. रमजान, सुरेश पोटदुखे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, विभागातील इतर प्राध्यापक वृद यांनी यशाबद्दल अभिनंदन केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here