Home
Home चंद्रपूर राम नवमी शोभायात्रेचे गांधी चौकात आ. किशोर जोरगेवार यांच्याकडून जल्लोषात स्वागत. ...

राम नवमी शोभायात्रेचे गांधी चौकात आ. किशोर जोरगेवार यांच्याकडून जल्लोषात स्वागत. पिण्याच्या पाण्याचे वाटप; भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरचे आयोजन.

0
142

HELLO CHANDA NEWS

चंद्रपूर,(का. प्र.) : राम नवमीच्या पवित्र आणि उत्साहपूर्ण पर्वानिमित्त चंद्रपूर शहरातून भव्य आणि आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. धार्मिक घोषणांनी, ढोल-ताशांच्या गजरात तसेच विविध मंडळांच्या देखण्या झांकींनी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. 

सदर शोभायात्रा गांधी चौकात पोहोचताच भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या स्वागत मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.   

                  सायंकाळी ७ वाजता सदर शोभायात्रेला सुरवात झाली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही शोभायात्रा गांधी चौक येथे पोहोचली. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने भव्य स्वागत मंच उभारण्यात आला होता.

    शोभायात्रा मंचाजवळ येताच आ. किशोर जोरगेवार यांनी विविध मंडळांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या झांकी, रथ आणि पारंपरिक सादरीकरणांचे स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.

  यावेळी आ किशोर जोरगेवार यांनी उपस्थित नागरिकांना राम नवमीच्या शुभेच्छा देत, “अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजात एकता, बंधुभाव आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चंद्रपूरची ही परंपरा कायम टिकून राहावी,” असे मत व्यक्त केले.

       शोभायात्रेत सहभागी झालेल्या विविध मंडळांचे, युवकांचे आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे आणि परिश्रमामुळे शोभायात्रेला एक वेगळे आकर्षण प्राप्त झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

           दरम्यान, शहरातील अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने विविध ठिकाणी शीतपेय, पाणी आणि भोजनदानाचे पंडाल उभारण्यात आले होते.

   उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आ. किशोर जोरगेवार यांनी या पंडालांना भेट देऊन स्वयंसेवकांचे कौतुक केले आणि त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. 

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here