Home
Home चंद्रपूर खुली कबड्डी स्पर्धेमुळे महिलांचे क्रीडा क्षेत्रातील बळ अधिक मजबूत होईल – आ...

खुली कबड्डी स्पर्धेमुळे महिलांचे क्रीडा क्षेत्रातील बळ अधिक मजबूत होईल – आ किशोर जोरगेवार. बक्षीस वितरणाने कबड्डी स्पर्धेचा समारोप.

0
94

HELLO CHANDA NEWS

   चंद्रपूर,(का. प्र.) : क्रीडा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते शिस्त, संघभावना, जिद्द आणि आत्मविश्वास शिकवणारे माध्यम आहे. आज मैदानावर उतरलेल्या प्रत्येक महिला खेळाडूमध्ये हीच जिद्द आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे. हीच ऊर्जा त्यांना पुढील आयुष्यात मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल.

            या स्पर्धेमुळे महिलांचे क्रीडा क्षेत्रातील बळ अधिक मजबूत होईल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

          आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवा अंतर्गत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने बाबूपेठ येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी मैदानात जिल्हास्तरीय रात्रकालीन महिलांची खुली कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाने स्पर्धेचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.

  यावेळी उपमहापौर प्रशांत दानव, गटनेते चंद्रशेखर शेट्टी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, सायली तोंडरे, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, बलराम डोडाणी, तुषार सोम, दशरथसिंह ठाकुर, गोपाल मुंधडा, आशिष मासिरकर, दिवाकर पुडट्टवार, नंदु गन्नुरवार, प्रदिप किरमे, प्रलश मशाखेतरी, शाहिन शेख, उमेश आयलु, विमल काटकर, कौसर खान, नगरसेविका शीतल गुरुनुले, पुष्पा उराडे, राजलक्ष्मी कारंगल, अॅड. सारिका संदुरकर, आशा देशमुख, ज्योती जिवने, अनुजा तायडे, डिलन केळझरकर, अमोल नालमवार,  अक्षय शेंडे, प्रश्नात करडभाजणे, महादेव कुंभारे, सुरेश बोरुवार, रमेश पुलीपाका, आकाश घोडमारे, राजेश तोडासे,  आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

 यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, कबड्डीसारख्या आपल्या पारंपरिक खेळामध्ये महिलांचा वाढता सहभाग पाहून मनापासून समाधान वाटते. आजच्या घडीला महिला केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातही आत्मविश्वासाने पुढे येत आहेत, ही अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी बाब आहे.

    या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी एक सक्षम आणि उत्तम व्यासपीठ उपलब्ध होत आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळत आहे.

      या महोत्सवामुळे महिलांचे क्रीडा क्षेत्रातील बळ अधिक मजबूत होईल आणि चंद्रपूरचे नाव राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढच्या वर्षी राजस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्याची सूचनाही यावेळी त्यांनी केली. पाच कबड्डी मॅट देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

           यावेळी उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन करणाऱ्या महिला खेळाडूंना त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत जय भवानी (ढोलवासा) संघाने प्रथम, जय महाकाली क्रीडा (चंद्रपूर) संघाने द्वितीय, तर जय श्री राम (लाठी)संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.

     सर्व संघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रीडाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

   आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्वात महिलांना नवे व्यासपीठ; पक्ष अधिक बळकट – सविता कांबळे

    भारतीय जनता पक्षाच्या माजी महिला अध्यक्ष तथा नगरसेविका सविता कांबळे यांनी उद्घाटन सामन्यात आपल्या भाषणात आमदार किशोर जोरगेवार यांच्या आयोजनाचे मनापासून कौतुक केले.

     त्या म्हणाल्या की, आमदार किशोर जोरगेवार नेहमीच महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात.

 अशा उपक्रमांमुळे महिलांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो.

  त्या पुढे म्हणाल्या की, या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांमुळे पक्षाच्या संघटनात्मक वाढीस मोठी मदत होते.

  आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्वात पक्ष सातत्याने बळकट होत असून, त्यांनी योग्य कार्यकर्त्यांना योग्य संधी देत पक्षविस्ताराचे प्रभावी काम केले आहे.

 महिलांना राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात पुढे आणण्यासाठी अशा उपक्रमांची आज अत्यंत गरज आहे.

          महिलांचा वाढता सहभाग हा समाजाच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा असून, या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here