Home
Home चंद्रपूर जिल्ह्यात 21 कृषी केंद्राचे परवाने निलंबित.  खत विक्रीतील अनियमिततेवर कृषी विभागाची कारवाई.

जिल्ह्यात 21 कृषी केंद्राचे परवाने निलंबित.  खत विक्रीतील अनियमिततेवर कृषी विभागाची कारवाई.

0
60

HELLO CHANDA NEWS

  चंद्रपूर,(वि. प्र.) : चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांकडून खत विक्रीमध्ये करण्यात येणाऱ्या अनियमिततेची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी धडक कारवाई केली आहे.

  बुधवारी 15 जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात पार पडलेल्या विशेष सुनावणीअंती जिल्ह्यातील 22 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर 5 कृषी केंद्रांना कडक ताकीद देण्यात आली.

         जिल्ह्यात काही कृषी केंद्रचालकांकडून खतांच्या साठ्याबाबत आणि विक्री दराबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 

         त्या अनुषंगाने जिल्हा गुण नियंत्रण पथकाने विविध केंद्रांची अचानक तपासणी केली असता, अनेक ठिकाणी खतांच्या साठ्यात तफावत आणि विक्रीच्या नोंदीमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आले.

            या तक्रारीच्या आधारे संबंधित केंद्रचालकांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले होते.

   परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुनावणी प्रक्रिया पार पडली.

यावेळी प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली.

   सुनावणी दरम्यान केंद्रचालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्याने 21 केंद्रांवर निलंबनाची कारवाई निश्चित करण्यात आली.

   शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे आणि त्यांना रास्त दरात निविष्ठा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे.

 खत विक्रीत किंवा इतर कोणत्याही कृषी निविष्ठांच्या बाबतीत गैरप्रकार करणाऱ्या केंद्र चालकांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

              या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनधिकृत साठेबाजी आणि खतांच्या चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

निलंबन करण्यात आलेले कृषी केंद्र.

1 रिध्दी कृषी केंद्र, राजुरा 2 आनंद कृषी केंद्र, साखरवाही 3 गणेश कृषी केंद्र, बेंबाळ 4 तिरुमला ॲग्रो एजन्सी, कोरपना 5 रवि कृषी केंद्र, कोरपना 6 साईराम कृषी केंद्र, अडेगाव 7 बालाजी कृषी केंद्र, विठ्ठलवाडा 8 ओम कृषी केंद्र, पांढरकवडा 9 रवि कृषी केंद्र, चंद्रपूर 10 महाकाली कृषी सेवा केंद्र, आरवट 11 दत्ता ॲग्रो सेंटर, पिपरी 12 वैद्य ॲग्रोटक, शेणगाव 13 दिवसे कृषी केंद्र, भद्रावती 14 गजानन कृषी केंद्र, भद्रावती 15 शुभम कृषी केंद्र, मासळ बु.16 नितीन कृषी केंद्र, किटाळीबोर 17 वैष्णवी कृषी केंद्र, बुरकुडाबुज 18 राजराजेश्वर कृषी केंद्र, वरुर रोड 19 निंब्रड कृषी केंद्र, राजुरा 20 शिव कृषी केंद्र, शेणगाव 21 महालक्ष्मी कृषी केंद्र, शेणगाव.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here