HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का.प्र.) – येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचे विद्यार्थांनी नुकतीच चंद्रपूर आकाशवाणी केंद्रास भेट देऊन तेथील कामकाज नेमके कसे चालते हे जाणून घेतले.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे उद्दिष्ट असलेले आकाशवाणी…मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध झाले असले तरी आकाशवाणी मात्र श्रोत्यांच्या मनात आपली जागा कायम राखून आहे.
सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रमाचा भाग म्हणून जनसंवाद विभागाचे अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनी चंद्रपूर आकाशवाणी केंद्रास भेट दिली. यावेळी जनसंवाद विभाग प्रमुख डॉ. पंकज मोहरीर, प्रा. संजय रामगिरवार, प्रा.अरविंद खोब्रागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. जनसंवाद विभागाचे विद्यार्थी यावेळी सहभागी झाले होते.
चंद्रपूर आकाशवाणी केंद्राचे अभियंता चंद्रकांत मत्ते यांनी केंद्राचे प्रसारण कसे होते हे तंत्रज्ञान विद्यार्थांना समजून सांगितले.
यावेळी सहायक संचालक तांत्रिक संध्या किलनाके याही उपस्थित होत्या. विद्यार्थांनी आकाशवाणी कार्यक्रमाचे लेखन, नभोवाणी चर्चा, वृतांत याविषयीचीही माहिती कार्यक्रम प्रमुख व अधिकारी उमेश दुपारे यांच्यासह उद्घोषक मंजूषा भास्करवार, हेमा बहादे यांच्याकडून जाणून घेतली.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.
























