Home
Home चंद्रपूर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दिला शब्द केला पूर्ण.१ कोटी २९ लाखांच्या निधीतून...

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दिला शब्द केला पूर्ण.१ कोटी २९ लाखांच्या निधीतून आधुनिक सभागृह साकार. प्रशासकीय भवनातील सुसज्ज सभागृहाचे लोकार्पण. आ. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक;खरीप हंगाम, पाणीटंचाई, शेतकरी प्रश्न व नागरिक सुविधांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत; उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार.

0
33

HELLO CHANDA NEWS

        चंद्रपूर,(का. प्र.) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून आणि विशेष प्रयत्नातून मूल येथील प्रशासकीय भवनातील सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण होऊन २४ एप्रिल २०२६ रोजी त्याचे लोकार्पण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले.

 जनतेला दिलेला शब्द वेळेत पूर्ण करण्याची त्यांची कार्यशैली पुन्हा एकदा यानिमित्ताने अधोरेखित झाली.

             याचवेळी मुल उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व शासकीय विभागाच्या प्रमुखांची आढावा बैठकही त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

        २ मे २०२५ रोजी तालुक्याच्या आढावा बैठकीदरम्यान या सभागृहातील अपुऱ्या सुविधा आणि कमतरता लक्षात घेऊन त्याच्या नूतनीकरणाचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले होते.

      आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जून २०२५ मध्ये सुमारे १ कोटी २९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

           अवघ्या एका वर्षात काम पूर्ण करून दिलेला शब्द पाळण्यात आला. वातानुकूलित, आधुनिक सुविधा असलेले आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारे हे सुसज्ज सभागृह आता जनसेवेसाठी उपलब्ध झाले असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेला नवी गती देणारे ठरणार आहे.

     याप्रसंगी तहसीलदार मृदुला मोरे, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमने, नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप दोडे, प्रवीण मोहूर्ले, चंदू मारगोनवार, नंदू रणदिवे, नगरसेविका अश्विनी निकोडे, प्राची आक्केवार तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

         यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, २ मे २०२५ रोजी आढावा बैठकीदरम्यान या सभागृहातील अपुऱ्या सुविधा आणि कमतरता स्पष्टपणे जाणवल्या होत्या.

  या भागाचा विकास अधिक वेगाने व्हावा, प्रशासन अधिक सक्षम व्हावे आणि सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा या दृष्टीने सभागृहाचे अद्ययावतीकरण करण्याची घोषणा आ.मुनगंटीवार यांनी केली होती.

          एक वर्षाच्या आत सुंदर, वातानुकूलित आणि आधुनिक सभागृह पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे.

   दिलेला शब्द वेळेत पूर्ण करणे हीच जनतेप्रती खरी बांधिलकी असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

      मुल येथे उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम, डायलिसिस सेंटर, सिमेंट काँक्रीट रस्ते, तहसील कार्यालय, पंचायत समिती इमारत, इको पार्क यांसारखी अनेक विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

      आढावा बैठकीत खरीप हंगामाची तयारी, पाणीटंचाई, शेतकरी प्रश्न, गॅस सिलेंडर टंचाई, घरकुल योजना, खेळाडूंसाठी मैदान, हातपंप दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पेट्रोल पंपावरील सुविधा, स्वच्छता, पोलीस बंदोबस्त आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

धानाच्या बोनससाठी सातत्याने पाठपुरावा.

  शेतकरी सन्मान योजनेत ९५ टक्के शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून उर्वरित शेतकऱ्यांची ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

 धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळावा यासाठी विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केला असून चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

कर्जमाफीबाबत दोन लाख रुपयांपर्यंत समिती गठीत झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

पाणीटंचाई तातडीने उपाययोजनांचे निर्देश.

 पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाबाबत सजग राहण्याचे निर्देश देताना त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूगर्भातील पाणी साठवण, गावनिहाय नियोजन आणि वनविभागासोबत समन्वय साधून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला.

  मुल येथे निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर टंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात, गॅस एजन्सींमध्ये बुकिंगसाठी योग्य व्यवस्था असावी तसेच गैरप्रकारांची तपासणी व्हावी, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

    बफर क्षेत्रातील गावांसाठी निर्धूर चूल, बीट किंवा जळाऊ लाकूड वाटपाचा पर्यायही विचारात घ्यावा, असे निर्देश दिले.

               स्वच्छतेवर विशेष भर द्या
पेट्रोल पंपांवर थंड पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सुविधा असणे आवश्यक असून तसे नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

      तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेवर विशेष भर देत मुल बसस्थानक परिसरात पोलीस शिपाई नियुक्त करण्याचे निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी दिले.

  सरपंचांसोबत संवाद साधण्याचे निर्देश.

   घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत स्तरावर आठवड्यातून एक दिवस बैठक घ्यावी, असे सांगत यशवंतराव घरकुल योजनेसाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. मुनगंटीवार यांनी दिली.

          खेळाडूंसाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध करून देण्याबाबतही मुख्याधिकाऱ्यांना सूचना त्यांनी केल्या.

           हातपंप दुरुस्ती, पाणीपुरवठा, सोलार, बोअरवेल, पाण्याच्या टाक्या, पाइपलाइन दुरुस्ती, पाणी नमुने तपासणी, बंद असलेल्या आरो मशीनची यादी तयार करणे आणि सरपंचांसोबत संवाद साधण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

       शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, तर उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान
यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील संगीता युवराज वासेकर आणि गणेश जगन्नाथ पुन्नावार यांना ३० हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

             तसेच तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील शिपाई शंकर सोयाम, प्रवीण गेडाम, धनराज पेडुकर आणि सुरेश दुधगावळी यांचा प्रशासनातील उत्कृष्ट सेवेबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here