Home
Home चंद्रपूर आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून 17  बालकांना जीवनदानाची नवी आशा.. हृदयात छिद्र...

आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून 17  बालकांना जीवनदानाची नवी आशा.. हृदयात छिद्र असलेल्या बालकांवर मुंबईत होणार मोफत शस्त्रक्रिया.

0
19

HELLO CHANDA NEWS

           चंद्रपूर,(का.प्र.) : आ. किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य तपासणी शिबिरातून अनेक गरजू बालकांना जीवनदानाची नवी आशा मिळाली आहे.

  या शिबिरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या बालकांपैकी तब्बल ३३ बालकांच्या हृदयात छिद्र (होल) असल्याचे निदान झाले होते. यापैकी पहिल्या टप्प्यात 17 बालकांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी ट्रेन ने मुंबई येथे रवाना करण्यात आले आहे.

           मुंबई येथील किम्स रुग्णालयात या बालकांवर अत्याधुनिक पद्धतीने निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

     विशेष म्हणजे या संपूर्ण उपचार प्रक्रियेसाठी लागणारा खर्च विविध शासकीय योजनांमधून तसेच आ किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून उचलण्यात येणार आहे.

 त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहणार्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

   या बालकांच्या मुंबई प्रवासाची व्यवस्थाराहण्याची सोयजेवणवैद्यकीय तपासण्या तसेच शस्त्रक्रियेपर्यंतचा संपूर्ण खर्च उचलण्यात येत असून पालकांनाही आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

      उपचारासाठी पाठविण्यात आलेली सर्व बालके ही १८ वर्षांखालील असल्याने त्यांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेतली जात आहे.

           गरजू व गंभीर आजारांनी ग्रस्त बालकांना योग्य वेळी उपचार मिळावेत आणि आर्थिक अभावामुळे कोणत्याही मुलाचे आयुष्य धोक्यात येऊ नयेया उद्देशाने आ किशोर जोरगेवार सातत्याने विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत.

       त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या चेहर्यावर आशेचा किरण निर्माण झाला आहे.

 आर्थिक परिस्थितीमुळे कोणतेही बालक उपचारांपासून वंचित राहू नयेहा आमचा प्रयत्न आहे.

       आरोग्य शिबिरातून हृदयविकाराने ग्रस्त बालकांची वेळेत तपासणी होऊन त्यांना योग्य उपचार मिळत आहेतही समाधानाची बाब आहे.

   या चिमुकल्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व मदत करण्यात येईल. प्रत्येक बालकाला निरोगी आयुष्य मिळावेयासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आ किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

पाच महिन्यांच्या चिमुकलीसह सहा महिन्यांच्या बालकावरही होणार शस्त्रक्रिया

  मुंबई येथे उपचारासाठी रवाना करण्यात आलेल्या बालकांमध्ये अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकलीचा तसेच सहा महिन्यांच्या बालकाचाही समावेश आहे. इतक्या लहान वयात हृदयात छिद्र असल्याचे निदान झाल्याने पालकांवर मोठे संकट ओढवले होते.

   मात्र आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून या बालकांना वेळेत उपचाराची संधी उपलब्ध झाली आहे.  

   या दोन्ही चिमुकल्यांसह सर्व बालकांवर मुंबई येथील किम्स रुग्णालयात निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च विविध शासकीय योजना व आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*                     *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168O69*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻*Gmail 📨⬆️⏬* *shashithakkar2409@gmail.com**9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here