HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर (वि.प्र.) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आरसीईआरटी), चंद्रपूर येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातर्फे “टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIT)” येथे विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम १४ मे २०२६ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने या औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि प्रशिक्षण व्यवस्थापनाची सखोल माहिती मिळाली.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक विभागांना भेट देत अत्याधुनिक यंत्रणा, सॉफ्टवेअर प्रणाली तसेच उद्योगांमध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक कार्यपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
यावेळी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील वाढत्या संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व तसेच भविष्यातील तांत्रिक बदलांविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून उद्योग क्षेत्रातील कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतली.
या औद्योगिक भेटीत विभागप्रमुख डॉ. नितीन जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ कोऑर्डिनेटर डॉ. मनीषा पिसे तसेच डॉ. वनिता बुराडकर यांनी विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी या औद्योगिक भेटीबद्दल समाधान व्यक्त करत हा अनुभव अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक व प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज, नवीन तंत्रज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक विकासाला निश्चितच चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069* *बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻*Gmail 📨⬆️⏬* *shashithakkar2409@gmail.com* *9860030082*