Home
Home चंद्रपूर सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा – आ....

सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा – आ. किशोर जोरगेवार. बाबूपेठ येथे सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न; विविध आजारांवर निशुल्क उपचार.

0
29

               HELLO CHANDA NEWS

    चंद्रपूर,(का. प्र.) सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

  नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यातआर्थिक परिस्थितीमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये आणि गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावेया उद्देशाने आयोजित भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिरात ते बोलत होते.

   चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरआचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे)सामान्य रुग्णालय चंद्रपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर बायपास रोडवरील के.जी.एन. कॉन्व्हेंट येथे भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर” आयोजित करण्यात आले होते.

 यावेळी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विभागप्रमुख डॉ. शशांक बोथरकरभारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारभाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष रघुवीर अहिरमहामंत्री श्याम कनकमसविता दंढारेविधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूरवंदना हातगावकरतुषार सोममंडळ अध्यक्ष प्रदीप किरमेसायली तोंडरेगणेश गेडामदिवाकर पुडट्टवारनिलिमा वनकरके.जी.एन. कॉन्व्हेंटचे संस्थापक महेमुद शेखविमल कातकर आदींची उपस्थिती होती.

   यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीआज आयोजित करण्यात आलेले हे भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर” हे केवळ एक आरोग्य शिबिर नसून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

समाजातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत.

   आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नयेया उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

               आज सर्वसामान्य कुटुंबांना मोठमोठ्या आजारांच्या उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा तपासण्याऔषधोपचार आणि शस्त्रक्रिया यांचा खर्च परवडत नसल्यामुळे रुग्ण उपचार घेण्यास उशीर करतात.

यामुळे आजार अधिक गंभीर होतात.

 हीच बाब लक्षात घेऊन विविध तज्ज्ञ डॉक्टरांना एकत्र आणत हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

                              या शिबिरामध्ये मेडिसिननेत्ररोगस्त्रीरोगबालरोगत्वचारोगअस्थिरोगकान-नाक-घसा तसेच शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत.

    रक्तदाबमधुमेहहृदयविकारमोतीबिंदूहर्नियामहिलांचे आजारसांधेदुखीत्वचारोग यांसारख्या अनेक आजारांवर मोफत तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

    विशेष म्हणजे गरज असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहेत. गरीब व गरजू नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळावाहा यामागचा मुख्य हेतू आहे.

  एक्स-रेरक्त तपासणीलघवी चाचणीसोनोग्राफी तसेच आवश्यकतेनुसार सीटी स्कॅन व एमआरआय तपासण्यादेखील मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

ही सेवा सामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले.

             काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक बालकांच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. त्यापैकी काही बालकांना मुंबई येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे.

     त्या चिमुकल्यांमध्ये अवघ्या पाच व सहा महिन्यांच्या बालकांचाही समावेश आहे. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता उत्तम आहेअसेही ते यावेळी म्हणाले. यावेळी हजारो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*                     *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻*Gmail 📨⬆️⏬* *shashithakkar2409@gmail.com* *9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here