HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का.प्र.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि इंधन बचतीचे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांच्या या आवाहनाला पूर्व अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रतिसाद देत स्वतःहून पुढाकार घेतला आहे.
हंसराज अहीर यांनी 17 मे 2026 रोजी आपला चंद्रपूर ते हैदराबाद (रायपुर सिकंदराबाद एक्सप्रेस) आणि परतीचा हैदराबाद ते चंद्रपूर असा प्रवास खाजगी वाहनाचा वापर टाळून ‘वंदे भारत एक्सप्रेसने केला. ‘‘देशहित आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने इंधन बचतीचा हा छोटासा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे, तसेच रस्त्याने प्रवास केल्यास एका बाजुला शेकडो लिटर पेट्रोल-डिझेल खर्च होतो.
त्याचबरोबर प्रदूषण व अपघातांचा धोका वाढतो. वंदे भारत सारख्या आधुनिक, आरामदायी आणि वेगवान ट्रेनचा वापर केल्याने इंधन व वेळेची बचत होते व आरोग्यदायी प्रवास शक्य होतो’’ अशा भावना त्यांनी या प्रवासादरम्यान व्यक्त केल्या.
या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने देशवासीयांना इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
शासकीय पातळीवर उपाययोजना सुरू असतांनाच, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा रेल्वेचा वापर केल्यास देशावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, असे सरकारचे मत आहे.
हंसराज अहीर यांनी स्वतः वंदे भारत रेल्वेने प्रवास करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला असून, इतर नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
























