Home
Home चंद्रपूर आरसीईआरटीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाची BHEL, हैदराबाद येथे औद्योगिक भेट.

आरसीईआरटीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाची BHEL, हैदराबाद येथे औद्योगिक भेट.

0
62

          HELLO CHANDA NEWS

चंद्रपूर,(का. प्र.) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), बाबूपेठ, चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), हैदराबाद येथे औद्योगिक भेट दिली.

     या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना विद्युत उपकरण निर्मिती प्रक्रिया, आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान तसेच उत्पादन व्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती मिळाली.

     या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, टर्बाईन तसेच विविध विद्युत उपकरणांच्या निर्मिती प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 उद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थापन यांची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे आणि विद्युत विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र के. धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर भेट पार पडली. या औद्योगिक भेटीत प्रो. अमित आक्केवार आणि प्रो. सौ. श्रीदेवी आक्केवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

 त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक संकल्पना अधिक स्पष्टपणे समजल्या आणि उद्योगातील कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

              या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्यांना भविष्यातील करिअरच्या दृष्टीने योग्य दिशा मिळाली आहे. अशा प्रकारच्या औद्योगिक भेटींमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*                     *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069* *बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻 *Gmail 📨⬆️⏬* *shashithakkar2409@gmail.com*     *9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here