यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पुष्पहार अर्पण करुन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, माझी नगर सेवक बलराम डोडानी, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, प्रा. श्याम हेडाऊ, विमल काटकर, कल्पना शिंदे, सोनाली आंबेकर, दुर्गा वैरागडे, चंदा करमरकर, जात्सना करमरकर, आशा देशमुख यांच्यासह आशा वर्कर आदींची उपस्थिती होती.
आज सर्वत्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे यंदाही यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आजवर पुरुषांचा ताबा असलेल्या अनेक क्षेत्रावर आता महिलांनी यशस्वी ताबा घेतला आहे. आजची स्त्री कुठेही मागे नाही. किंबहुना शिक्षणात तर पुरुषांच्या समोर ती जात असतांना दिसुन येत आहे. त्याकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उभारलेल्या स्त्री शिक्षणाच्या लढ्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. विविध क्षेत्रात पूढे जात असलेल्या स्त्रीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीचे प्रयत्न सुरु असतात. यासाठी त्यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीचेही कौतुक केले आहे. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============÷÷÷÷÷========
संपादक :- शशी ठक्कर 9881277793