Home
Home चंद्रपूर * महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चंद्रपूर तर्फे एम. ई. एल. केंद्रात वैज्ञानिक...

* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चंद्रपूर तर्फे एम. ई. एल. केंद्रात वैज्ञानिक दृष्टीकोन चमत्कार प्रात्यक्षिक आणि जादूतोना विरोधी कायदा यावर अनिल दहागांवकर, धनंजय तावाडे यांनी मार्गदर्शन केले. जेष्ठ कार्यकर्ते सुरज सोनारकर उपस्थित होते.*

0
97

=======================

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय चंद्रपूर तर्फे प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत एम. ई. एल.मुल रोड(Chanda Ferro Alloy Ltd.SAIL) येथील कामगार कल्याण केंद्रात कामगार कुटुंबियांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव धनंजय तावाडे ,जिल्हा संघटक अनिल दहागावकर यांनी अंधश्रद्धांशी संबंधित विविध विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले तसेच भूत, भानामती तंत्र, मंत्र ,जादूटोणा, बुवाबाजी तथाकथित चमत्कार आदि अस्तित्वहीन बाबींवर विश्वास न ठेवता जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले.याप्रसंगी जादूटोणाविरोधी कायद्यातील तरतुदींवर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सुरज सोनारकर, सुरक्षा विभागाचे कुळमेथे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामगार कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनात एम. ई.एल. कामगार कल्याण केंद्राच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===============≠====≠======

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here