++++++++++++++++++++
* शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था *
—————————
भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमीत्त निघालेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, करणसिंग बैस, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, मुन्ना जोगी, विश्वजीत शहा, रुपेश पांडे, तापोष डे, चंद्रशेखकर देशमुख, सतनाम सिंग मिरधा, आनंद रणशूर, बादल हजारे, कल्पना शिंदे, आशा देशमुख, वंदना हजारे आदींची उपस्थिती होती.
भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त लिंगायत समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेली शोभायात्रा सायंकाळी सात वाजताच्या सुमारास यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचाजवळ पोहोचली यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. तर ब्राम्हण समाजाच्या वतीने भगवान परशुराम यांच्या जयंती निमीत्त काढण्यात आलेली शोभायात्रा रात्री 9 वाजताच्या सुमारास यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचाजवळ पोहोचली यावेळी सदर शोभायात्रेचे स्वागत करत भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
+++++++++++++++++-+++
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
+++++++++++++++-++++++++++
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















