***********************
काम करत असतांना जे.सी.बी मशीन अंगावर पलटल्याने मृत्यु झालेल्या जे.सी.बी आॅफरेटर विजय खंडेराव यांच्या कुटुंबीयांची आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली असुन त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, सायली येरणे, कल्पना शिंदे यांची उपस्थिती होती.
*******************************
विजय खंडवार हे जे.सी.बी आॅफरेटर होते. ते नेहमी प्रमाणे गुरुवारला शिवणी येथील साईडवर काम करत होते. या दरम्यान जे.सी.बी मशीन अनियंत्रीत होऊन पलटी झाली. यात ते मशीन खाली दबल्यागेल्याने त्यांचा मृत्यु झाला. आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या बाबुपेठ येथील निवासस्थानी जात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी परिवराची सांत्वन करत परिवाराला आर्थिक मदत केली आहे. पुढे कोणतही अडचण आल्यास आपल्या पाठीशी असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कुटुंबीयांना म्हटले आहे.
****************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
******************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















