Home
Home चंद्रपूर *महापालिकेकडून अतिक्रमण धारकांना देण्यात येते अभय*

*महापालिकेकडून अतिक्रमण धारकांना देण्यात येते अभय*

0
96

**************************

* Nilesh Thakre * 

****************************

चंद्रपुर – चंद्रपुर शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न माेठ्या प्रमाणात ऐरणीवर आला असून, मुख्य बाजातच नव्हे तर मुख्य रसत्यावरील व्यापारी पायदळी चालण्याकरिता असणारे फुटफाथ काबिज करून बसले आहेत. तसेच मुख्य रसत्यावर वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या आणि रस्त्यावर हातगाडी, विक्रेते तसेच हॉकर्स उभे राहत असल्याने चंद्रपुरातील नागरिक आता त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी केल्या नंतर ही त्याची साधी दखल सुध्दा घेतली जात नाही. अतिक्रमण विरोधी कारवाई केली जात नाही. म्हनुन त्यानंतर मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणेच ही अतिक्रमण ‘जैसे थे’ तसेच राहत आहेत.

***************************

चंद्रपुर शहराचा वाढता विस्तार पाहता, शहराच्या मुख्य बाजारपेठेसह विविध प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वा पदपथावर दुकाने थाटणाऱ्यांकडून आता चक्क पत्र्याचे शेड टाकून, कायम स्वरूपी हाथठेले मुख्य रसत्यावर अतिक्रमण करण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रपुर महानगरात सुरळीत रस्ता असुनही वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून शहर सौंदर्यीकरणाला बाधा होतांना दिसुन येते. यात राजकीय व्यक्ती, पक्ष, संघटनांनी शिरकाव केल्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना अभय मिळत असून, त्यांच्यावर कारवाईसाठी महापालिकेचे हात थिटे पडत आहेत. बऱ्याच वेळा मनपाने अतिक्रमण मोहीम राबविल्यास राजकीय पक्ष, संघटनांकडून त्यास विरोध होण्याचे व अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम राजकारणी करतांना दिसतात.

************************

मनपाच्या अतिक्रमण विभागात अपुरे मनुष्यबळ असून, त्यामुळे कायमस्वरूपी अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात फार अडचणी येतात. कधी कधी पुरेसा पोलिस बंदोबस मिळत नसल्यानेही मोहीम राबविता प्रकार घडू लागल्याने ही मोहीम यशश्वी रीत्या राबवण्यात येत नाही.

*****************************

चंद्रपुर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे दर दिवशी किमान चार ते पाच अतिक्रमणाच्या विरोधात तक्रारी दाखल होत असतात. वर्षभरात साधारणतः हजार ते अकराशे तक्रारी प्राप्त होतात व त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत निकाली काढल्या जातात.

*******************************

तक्रार आल्यावरच कारवाई हाेते म्हनुन, मनपाचे कर्मचारी सांगतात मात्र खरे पण ताेंड पाहुनच कर्मचारी कारवाही करतांना दिसतात हे खरे आहे.

********************************

महापालिकेकडे लेखी या ऑनलाइन तक्रार आल्यास त्याची खातरजमा करून कारवाई केली जाते. असे कागदावरच सांगुन स्वताचीच प्रेसनाेट देवुन वृत्त पत्रात मनपा मार्फत जाहीरात करण्यात येते.

***********************************

डोळ्यासमोर दिसणाऱ्या अतिक्रमणाबाबत तक्रार असुन ही त्यावर मात्र कारवाई करण्यास मनपा कडुन टाळाटाळ केली जात असल्याच्या अनक तक्रारी आहेत.

************************************

चिरीमिरी घेऊन दिले जाते अतिक्रमणाला अभय महापालिकेच्या अतिक्रमण विभागा कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचायांचे अतिक्रमणधारकांशी हातमिळवणी असल्यामुळे कुठलीत कारवाई होत नाही. मनपाच्या कार्यालयाला अतिक्रमणाने विळखा घातला हे त्याचेच द्योतक आहे.

***********************************

अतिक्रमण हटाव विभागात माणसे कमीच आहेत.
कारवाई न करण्याचे कारणे काय? हे जर बघीतल्यास बहुतांश तक्रारी या व्यक्तिगत भांडणातून केल्या जातात. काही वाद न्यायालयात प्रलंबित असतात तर काही ठिकाणी संवेदनशील विषय असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारवाई टाळली जाते. तक्रार आल्यास कारवाई मनपाकडे अतिक्रमणाची तकार आल्यास त्याची खातरजमा करून विभागीय अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ कारवाई केली खरच करते का असा ही प्रश्न आता जनतेतुन व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर रस्त्यांवरील अतिक्रमणाच्या विरोधात बाराही महिने कागदावरच कारवाई केली जाते व दाखवली जाते. हे चंद्रपुर मनपा स्वताला यातच धन्य समजते हे विशेष आहे.

*********************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*******************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here