**********************
चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे अधीक्षक पदावर रुजू झालेले अनुपकुमार कुमरे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी सय्यद रमजान अली, यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत सत्कार केले मौलाना तूफैल, आसिफ पठाण प्रामुख्याने हजर होते.
जेल अधिकारी सोनोने साहेब,हिरोले, मुंगले,दशमवार,वसीम राजा सह अनेक मान्यवर हजर होते.
मोहरम निमित्त बैठक घेण्यात आली या बैठकीत मोहरम च्या 9आणि 10 तारीख म्हणजे 28 व 29 जुलै रोजी जेल स्थित हजरत मखदुम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली दर्गाह चे दर्शन भाविकगण साठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रवेश द्वार उघडण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन शांततेने हा कार्यक्रम पार पाडू असे विश्वास जेल अधीक्षक अनुपकुमार कूमरे यांनी व्यक्त केले.जेल प्रवेशद्वार उघड़न्यासाठी लागनारी आवश्यक ती परवानगी संबंधी पाठपुरावा सुरु असुन लवकरच परवानगी मिळेल असे सांगितले.
जेल येथील हजरत मखदुम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली यांचे दर्गाह चे दर्शन सर्व जाती धर्माचे बंधू भगिनी घेतात लाखों चा संख्येत भाविकगण येतात येथील पाणी सर्व भक्तगण आपल्या घरी नेतात येथील पाणी च्या बाबतीत भक्तगणात अपार श्रध्दा आहे हे मात्र विशेष.
***************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793