Home
Home चंद्रपूर *त्या ग्रामसेवकाला तत्काल निलंबित करा :- आम आदमी पार्टी उपाध्यक्ष सुमित हस्तक...

*त्या ग्रामसेवकाला तत्काल निलंबित करा :- आम आदमी पार्टी उपाध्यक्ष सुमित हस्तक यांची मागणी*

0
109

******************************

दि. 26 जुलाई 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व कार्यकारी अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांची भेट घेण्यात आले. भद्रावती तालुक्यात सांसद आदर्श ग्रामपंचायत म्हणून व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे दत्तक गाव म्हणून चंदनखेडा हे गाव ओळखल्या जाते. या ग्रामपंचायत मधे श्री. किशोर नाईकवार हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दिनांक 25 जुलै 2023 रोजी ग्रामसेवक श्री. किशोर नाईकवार व ग्रामपंचायत मधले कर्मचारी वर्ग हे ग्रामपंचायत कार्यालय मधे एका खोलीत खुलेआम मध्यपान सेवन करताना आढळले. या प्रकरणात आम आदमी पार्टी भद्रावती चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व कार्यकारी अधिकारी पंचायत समिती भद्रावती इथे भेट घेउन त्या ग्रामसेवक व कर्मचारी यांना निवेदनाद्वारे तत्काल निलंबनाची मागणी करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय भाऊ सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे, विकी मुळेवार, शुभम भोसकर, आशिष बारतीने, गौरव चांदेकर, दिलीप कापकर, अनिल कोकुडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

******************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here