* मनसेच्या आक्रमक तालुका अध्यक्षाचा आज वाढदिवस *

0
48

**************************

जिवती: अतिदुर्गम आदिवासी तालुक्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या करिता खुप संघर्ष करावा लागतो कारणही तसेच राहतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना झाली आणि महाराष्ट्र भर पक्षाची बांधणी सुरू झाली त्या वेळी तालुक्यात मनसे या पक्षाचा उगम झाला त्यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तरुण पिढीवर प्रभाव असल्यामुळे तरुण पिढी मनसे पक्षाकडे आकर्षित होत होती त्याच वेळी तालुक्यातील शेणगाव येथील हक्कानी शेख यांच्या सोबत इतर तरुणांनी मनसे मध्ये प्रवेश केले आणि शेणगाव शाखा अध्यक्ष पदावर हक्कानी शेख यांची निवड करण्यात आली मग खऱ्याअर्थाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांची सुरुवात झाली मग गोरगरिबांनच्या काम असोकी शेतकऱ्यांचे काम असो एकदा हातात काम घेतले की त्या कामाचा छडा लावायचा हक्कानी शेख यांच्या कार्याची जिल्हा पातळीवरील पदाधिकार्यांनी दखल घेऊन दिनांक १५/१२/२०१२ रोजी मनसेच्या वाहतूक सेना जिवती तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आणि पक्षाचा काम वाढलं तेवढ्याच ताकदीने काम कार्यकर्त्यांचे असो की लोकांनचे काम असो करण्यासाठी धडपड करुन न्याय मिळे पर्यंत दम पडायचे नाही तालुक्यात पक्षाची ताकद नसल्यासारखी असुन सुद्धा एक निष्ठेने पक्षाचे कार्य सुरू असल्याने वरिष्ठांनी हक्कानी शेख यांच्यावर विश्वास ठेवून पक्षाच्या मुख्य शाखेच्या जिवती तालुका उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली पक्षाच्या लेटर पॅडवर निवेदन देऊन शासन प्रशासनाला धारेवर धरुन लोकांचे काम करण्यास भाग पाडण्याचे काम केले म्हणून दिनांक २१/१०/२०१६ रोजी मनसेच्या तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आणि कामाचा वेग वाढला तालुक्यात पक्षाची ताकद नसुन सुध्दा शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामासाठी पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय स्टेट बँक पाटण येथे आंदोलन करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. सिडीसिसी बॅंक जिवती येथे काही शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी चकरा माराव्या लागत असल्याची माहिती मिळाली तसेच बॅंकेच्या मॅनेजर ला भेटून चर्चा करण्यात आली आणि तहसीलदार जिवती यांना भेटून निवेदन दिले आणि तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले प्रत्येक वेळी अन्याय अत्याचाराच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात निवेदनाच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात लोकांचे दवाखान्याचे काम असो की पोलिस स्टेशनचे, तहसील कार्यालयाचे, पंचायत समितीचे असो की इतर शासकीय कार्यालयाचे काम असो सदैव प्रयत्न करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिवती तालुका अध्यक्ष हक्कानी शेख यांच्या आज दिनांक २७/ ०७/२०२३ रोजी वाढदिवस असल्याने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here